हक्काच्या पैशांसाठी शिक्षकांमध्ये प्रचंड संताप; रणजित शिवतरे यांच्याकडून शिक्षण विभागाची झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 12:33 PM2021-07-13T12:33:31+5:302021-07-13T12:33:37+5:30

पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने फंडविभागातील दप्तर दिरंगाई विरोधात जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्याकडे मागितली दाद

Huge outrage among teachers for the right money; Ranjit Shivtare's scrutiny of the education department | हक्काच्या पैशांसाठी शिक्षकांमध्ये प्रचंड संताप; रणजित शिवतरे यांच्याकडून शिक्षण विभागाची झाडाझडती

हक्काच्या पैशांसाठी शिक्षकांमध्ये प्रचंड संताप; रणजित शिवतरे यांच्याकडून शिक्षण विभागाची झाडाझडती

Next
ठळक मुद्दे शिवतरे यांनी शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची झाडाझडती घेतल्यावर शिक्षण विभागाने आठवडाभरात सर्व प्रस्ताव मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

बारामती: पुणे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांचे दोनशेहून अधिक प्रस्ताव मागील सहा महिन्यांपासून पडून आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही शिक्षकांना हक्काचे पैसे मिळत नसल्याने शिक्षकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने फंडविभागातील दप्तर दिरंगाई विरोधात जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्याकडे दाद मागितली. यावेळी झालेल्या बैठकीत शिवतरे यांनी शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची झाडाझडती घेतली. उपाध्यक्ष यांच्या प्रश्नांपुढे निरुत्तर झालेल्या शिक्षण विभागाने आठवडाभरात सर्व प्रस्ताव मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.

यावेळी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जि.प. सदस्य मोहित ढमाले, शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे, नेते राजेंद्र जगताप, कार्याध्यक्ष पोपटराव निगडे, तालुकाध्यक्ष रमेश कुंजीर यांच्यासह जिल्हासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Huge outrage among teachers for the right money; Ranjit Shivtare's scrutiny of the education department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.