कोरोना संकटातही म्हाडाच्या घरांसाठी प्रचंड प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:13 AM2021-06-16T04:13:11+5:302021-06-16T04:13:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्यावतीने सर्वसामान्य लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणे, ...

Huge response for MHADA houses even in Corona crisis | कोरोना संकटातही म्हाडाच्या घरांसाठी प्रचंड प्रतिसाद

कोरोना संकटातही म्हाडाच्या घरांसाठी प्रचंड प्रतिसाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्यावतीने सर्वसामान्य लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणे, पिंपरी-चिंचवडसह सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांतील तब्बल २९०८ घरांची सोडत काढण्यात आली. कोरोनाचे संकट असतानाही म्हाडाच्या घरांना सर्व स्तरातील लोकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, तीन हजार घरांसाठी तब्बल ५७ हजार लोकांनी अर्ज केला आहे. आता या घरांची सोडत जूनअखेरपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती पुणे म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांनी दिली.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळांतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवडसह सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांतील तब्बल २९०८ घरांची सोडत काढण्यात आली.

कोरोना संकट असतानाही सहा महिन्यांत दोन वेळा आणि तेही तब्बल दोन हजारपेक्षा अधिक घरांची सोडत काढण्याचा नवा विक्रम पुणे म्हाडाने केला आहे. यात सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सांगली या जिल्ह्यांतील म्हाडाच्या २१५३ सदनिका व २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील प्राप्त झालेल्या ७५५ सदनिका अशा एकूण २९०८ सदनिकांची अंतिम नोंदणीसाठी १३ मेपर्यंत मुदत होती. पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व नागरिकांच्या व लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव सदर जाहिरातील योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली.

५० हजार अर्जदारांनी भरले पैसे

घरांसाठी अर्ज करण्यास १३ जूनपर्यंत मुदत होती. आता ही मुदत संपली असून २९०८ घरांसाठी ५७ हजार अर्ज आले असून, यापैकी ५० हजारपेक्षा अधिक लोकांनी पैसे भरले आहेत. सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता जूनअखेरपर्यंत ही सोडत काढण्यात येणार असल्याचे नितीन माने-पाटील यांनी सांगितले.

Web Title: Huge response for MHADA houses even in Corona crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.