पाषाण टेकडीच्या बचावासाठी विश्वसुंदरी युक्ता मुखीसह नागरिकांची मानवी साखळी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 02:31 PM2019-05-02T14:31:09+5:302019-05-02T14:44:01+5:30
पाषाण टेकडी बचाव समिती यांच्यावतीने पाषाण टेकडीवर होत असलेल्या काँक्रीटीकरणाचे काम त्वरित थांबवावे व झालेले काम काढण्यात यावे. व पालिकेच्या कामाचा निषेध नोंदवण्यासाठी पाषाण टेकडीवर मानवी साखळी करून सहय़ांची मोहीम घेण्यात आली.
पाषाण : पाषाण टेकडी बचाव समिती यांच्यावतीने पाषाण टेकडीवर होत असलेल्या काँक्रीटीकरणाचे काम त्वरित थांबवावे व झालेले काम काढण्यात यावे. व पालिकेच्या कामाचा निषेध नोंदवण्यासाठी पाषाण टेकडीवर मानवी साखळी करून सहय़ांची मोहीम घेण्यात आली.
यावेळी खासदार वंदना चव्हाण, विश्वसुंदरी युक्ता मुखी ,नगरसेवक अमोल बालवडकर , धर्मराज पाटील, माजी स्थायी समिती अध्यक्ष शाम देशपांडे पुष्कर कुलकर्णी, दीपक श्रोते, रवींद्र सिन्हा, शशांक देशपांडे, वैशाली पाटकर , गणेश कलापुरे, शैलेंद्र पटेल, डॉ. अनुपम सराफ, डॉक्टर कुसुम चंद्रकांत गारुडकर आदी उपस्थित होते.यावेळी नगरसेवक अमोल रतन बालवडकर यांनी भेट देऊन सह्याची मोहिम ( आंदोलन ) करणाऱ्या पर्यावरण प्रेमी व पाषाण सुस टेकडी बचाव समिती याच्यांशी चर्चा केली. यापुढे टेकडीवर काँक्रीटीकरण व बांधकाम होणार नाही असे आश्वासन दिले. पर्यावरण प्रेमी यांचे समाधान झाल्याने पर्यावरण प्रेमी यांनी टेकडीवर मानवी साखळी करून सह्याची मोहिम आंदोलन स्थगित केले. सह्यांच्या मोहिमे अंतर्गत करण्यात आलेल्या सह्या चे निवेदन पुणे मनपा यांना देणार आहेत.
सदर आंदोलनात सुमारे ८०० नागरिकांनी सह्या करून टेकडीवरील पालिकेच्या कामाचा निषेध नोंदवला व मानवी साखळीत सहभाग घेतला. वसुंधरा अभियानचे , भुजल अभियान , एरिया सभा असोसिएशन ऑफ पुणे , जलदेवता सेवा अभियान, डेक्कन मोहल्ला कमिटी आदी विविध संघटनांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते .शाम देशपांडे म्हणाले, पुणे शहरातील टेकड्या वाचवल्या गेल्या पाहिजेत सुविधांच्या नावाखाली सुशोभिकरणाच्या नावाखाली चांगल्या हेतूने जरी काम झाले तरी ते योग्य नाही. पालिकेने केलेले काँक्रिटचे काम पालिकेने त्वरित काढले पाहिजे .
खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, टेकडी वाचवण्यासाठी स्थानिक नागरिकांची एक समिती असली पाहिजे. टेकडी वाचवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. नागरिकांची टेकड्या वाचवण्यासाठीची सतर्कता महत्त्वाची आहे .दरम्यान नवचैतन्य हास्ययोग परिवारातील ज्येष्ठ नागरिकांनी पर्यावरणपूरक रस्ता ज्येष्ठ नागरिकांना येण्या जाण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या शेडपर्यंत करण्याची मागणी करण्यात आली होती असे सांगितले .