खाकी वर्दीतील माणुसकी...,६ वर्षापासून हरवलेले वयोवृध्द घरपोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:08 AM2021-06-29T04:08:40+5:302021-06-29T04:08:40+5:30
त्या बाबांचे नाव एकनाथ ज्ञानु कारंडे (वय ६५ ) ( रा उमरकांचन ता.पाटण जि.सातारा )अशी माहीती मिळाली. गेंगजे यांनी ...
त्या बाबांचे नाव एकनाथ ज्ञानु कारंडे (वय ६५ ) ( रा उमरकांचन ता.पाटण जि.सातारा )अशी माहीती मिळाली. गेंगजे यांनी सातारा पोलिस स्टेशनला माहीती कळवली. तिथून उमरकांचन पोलिस स्टेशनच्या माध्यमातून पोलीस पाटील मोहीते यांच्याशी संपर्क साधला. मोहिते यांनी त्या बाबाबद्द्ल सर्व माहिती प्रविण गेंगजे यांना कळवली त्यात त्या बाबांच्या मुलाचा मोबाईल नंबर मिळाला. त्यानुसार त्या मुलाला त्या बाबांच्याविषयी माहिती सांगितली असता मुलाने तात्काळ खेडला येतो म्हणून सांगितले. मुलगा राजेश एकनाथ कारंडे हे बाबांना घ्यायला आले. चास कमान धरण परिसरात जाऊन वयोवृद्ध वडिलांना ताब्यात घेतले.
राजेश एकनाथ कारंडे यांनी सांगितले की आम्ही पुण्यात पिंपळे निलख भागात कामाला असल्याने त्या ठिकाणावरुनच माझे वडील हे ६ वर्षापासुन बेपत्ता होते. आम्ही वाकड पोलीस स्टेशनला हरविल्याबाबत तशी रितसर तक्रार दाखल केली होती. खूपवेळा शोध घेऊन देखील बाबा सापडत नव्हते परंतु पोलीस हे देवासारखे मदतीला धावून आलेत यावर आमचा विश्वासच बसत नाही. आमच्या कुटुंबातील बाबांना सापडून दिल्याबद्दल हात जोडून आभार मानले. यावेळी मुलाला वडील मिळाल्याचा आनंद मुलाच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. ही सर्व घटना मन सुन्न करणारी होती. माणुसकीच्या नात्यातून बाबांना घर मिळाले याचे समाधान पोलीस प्रविण गेंगजे यांना मिळाले होते.
वयोवृध्द वडिलांना ताब्यात घेताना मुलगा राजेश कांरडे व इतर.
पोलिस कर्मचारी प्रविण गेंगजे