महापालिका शाळेतील नम्रता निघाली युरोपला

By Admin | Published: June 16, 2015 12:52 AM2015-06-16T00:52:42+5:302015-06-16T00:52:42+5:30

महापालिका शाळांमधील शिक्षणाच्या दर्जा चांगला नसतो, तिथे शिक्षणासाठी चांगले वातावरण नसते असा सर्वसाधारण समज आहे.

The humility of the municipality school went out to Europe | महापालिका शाळेतील नम्रता निघाली युरोपला

महापालिका शाळेतील नम्रता निघाली युरोपला

googlenewsNext

पुणे : महापालिका शाळांमधील शिक्षणाच्या दर्जा चांगला नसतो, तिथे शिक्षणासाठी चांगले वातावरण नसते असा सर्वसाधारण समज आहे. मात्र, गंज पेठेतील पालिकेच्या आचार्य विनोबा भावे शाळेतून दहावी उत्तीर्ण झालेल्या नम्रताने हा समज खोटा ठरविला आहे. कारण ती आता पुढील शिक्षणासाठी युरोपला चालली आहे. युनायटेड वर्ल्ड कॉलेजेस या संस्थेच्या एका शिष्यवृत्तीअंतर्गत तिची निवड केली आहे.
नम्रता खानविलकर असे या विद्यार्थिनीचे नाव. आठवीपर्यंतचे शिक्षण बिबवेवाडीतील पालिकेच्या शाळेत पूर्ण केल्यानंतर तिने पुढील शिक्षणासाठी आचार्य विनोबा भावे शाळेत प्रवेश घेतला. इथे तिने इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतले. दहावीच्या परीक्षेत तिला ८७.६० टक्के गुण मिळाले आहेत. तिची आई आशा खानविलकर या गृहिणी असून, वडील अनंत खानविलकर हे खासगी कंपनीत चालक म्हणून काम करतात. आता नम्रता अकरावी व बारावीच्या शिक्षणासाठी युरोप खंडातील अरमेनिया इथे जाणार आहे. युनायटेड वर्ल्ड कॉलेजस या संस्थेची जगभरात विविध ठिकाणी शाळा व महाविद्यालये आहेत. संस्थेमार्फत शिक्षणासाठी विविध शिष्यवृत्त्या दिल्या जातात. या शिष्यवृत्तीसाठी शाळेमार्फत पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. देशातील सुमारे ५५० विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. विविध टप्प्यांवर परीक्षा, चर्चा, मुलाखत, उपक्रमाच्या माध्यमातून १२० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये भावे शाळेतील नम्रतासह रमेश बी. व श्लोक सदलाकपूरकर यांची निवड झाली आहे. ही शाळा ही आकांक्षा फाऊंडेशन या संस्थेतर्फे चालविली जाते.
तिघांपैकी नम्रताची निवड अरमेनियातील महाविद्यालयात झाली आहे. तर दोघे मुळशीतील महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतील. याविषयी ‘लोकमत’शी बोलताना नम्रता म्हणाली, की मला खूप आनंद झाला आहे. शाळेनेच अर्ज केला होता. पण, अभ्यास करून त्यात यश मिळविले. तिथे नियमित शिक्षणाबरोबरच खूप उपक्रम असल्याने फायदा होणार आहे. आशा खानविलकर यांनीही आपल्या मुलीच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. आपल्या मुलींनी इंग्रजी शिकावे असे खूप वाटत होते. पण त्यांनी अपेक्षेपेक्षा खूप काही दिले आहे. नम्रताच्या या यशात तिच्या शाळेचा मोठा वाटा आहे. तसेच वडिलांनीही खूप कष्टाने सर्वांना उभे केले आहे.

Web Title: The humility of the municipality school went out to Europe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.