शंभर कोटी रुपयांच्या खोट्या नोटा पकडून देतो सांगत पोलिसांचीच फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:12 AM2021-02-24T04:12:14+5:302021-02-24T04:12:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर : शंभर कोटी रुपयांच्या बनावट नोटा पकडून देतो असे सांगून पोलिसांची एक लाख रुपयांची ...

Hundreds of crores of rupees in fake notes seized by the police | शंभर कोटी रुपयांच्या खोट्या नोटा पकडून देतो सांगत पोलिसांचीच फसवणूक

शंभर कोटी रुपयांच्या खोट्या नोटा पकडून देतो सांगत पोलिसांचीच फसवणूक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरूर : शंभर कोटी रुपयांच्या बनावट नोटा पकडून देतो असे सांगून पोलिसांची एक लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुंबई येथील खोट्या खबऱ्याला त्याच्या साथीदारांसह पुणे दहशतवादी पथक आणि पोलिसांनी न्हावरा फाटा (ता. शिरूर) येथून अटक केली. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिकंदर परमेश्वर राम (वय ३२ रा. आंबेडकरनगर, वरळी, मुंबई), कमलेश जैन, प्रशांत झुटानी, के. पी. सिंग (रा. गुजरात) असे या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. या चार आरोपींपैकी सिकंदर परमेश्वर राम याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता २ मार्चपर्यंत आठ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. त्याचे तीन साथीदार फरार झाल्याची माहीती पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली.

याबाबत किरण श्याम कुसाळकर दहशतवादी विरोधी पथक पुणे यांनी फिर्याद दिली आहे. दहशतवादी विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते यांना गोपनीय बातमीदाराने रांजणगाव परिसरात १ कोटी रुपयांच्या बनावट नोटांची गोडाऊन पकडून देतो त्यासाठी एक लाख रुपये द्या असे सांगितले. त्याप्रमाणे पुणे दहशतवादी विरोधी पथकाने गोपनीय बातमीदार सिकंदर राम याला सिक्रेट फंडातून एक लाख रुपये दिले. हे गोडाऊन दाखविण्यासाठी तो मुंबईहून जुन्या महामार्गाने लोणावळा, तळेगाव दाभाडे-चाकण येथून शिक्रापुरमार्गे रांजणगाव कडे आला. परंतु गावाजवळ आला असता त्याने गाडीचा वेग वाढविल्याने पोलिसांना फसवल्याचा संशय आला. पोलिसांच्या पथकाने आरोपीच्या गाडीचा पाठलाग करून त्याला अटक केली. तसेच त्याला दिलेली रक्कम जप्त केली.

दहशतवादी विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, एस. आय . पवार पोलीस पथकाने दोन टीम करून खोटी माहिती देणारे गोपनीय बातमीदार सिकंदर राम यास अटक केली आहे. त्यांच्यावर शिरूर पोलीस ठाण्यात येथे पोलीस हवालदार प्रफुल्ल भगत यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक किरण उंदरे करीत आहे.

Web Title: Hundreds of crores of rupees in fake notes seized by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.