नावळी भूसंपादनाने होणार शेकडो शेतकरी भूमिहीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 01:45 AM2018-07-10T01:45:45+5:302018-07-10T01:45:57+5:30

नावळी (ता. पुरंदर) येथे जेजुरी एमआयडीसीच्या विस्तारासाठी भूसंपादनाची प्रक्रिया काही दिवसांपासून सुरू आहे.

Hundreds of farmers will be subjected to marshy land acquisition | नावळी भूसंपादनाने होणार शेकडो शेतकरी भूमिहीन

नावळी भूसंपादनाने होणार शेकडो शेतकरी भूमिहीन

Next

नीरा - नावळी (ता. पुरंदर) येथे जेजुरी एमआयडीसीच्या विस्तारासाठी भूसंपादनाची प्रक्रिया काही दिवसांपासून सुरू आहे. एमआयडीसीचा विस्तार, तसेच शेतकऱ्यांचा विरोध हे समीकरण गेल्या तीन वर्षांपासून सुरू असून शेवटी शेतक-यांनी साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. आज तेराव्या दिवशी सलग उपोषण सुरू असूनही सरकार, तसेच प्रशासकीय अधिकारी शेतकºयांचे प्रश्न समजून घेऊन
त्यावर मार्ग काढण्यात अपयशी ठरल्याचे दिसत आहेत. या भूसंपादनामुळे शेकडो शेतकरी भूमिहीन होणार असून देशोधडीला लागणार आहेत.
भूसंपादन करताना बागायत जमिनी सरकार घेत असून नेमके चार-दोन राजकीय पुढाºयांच्या फायद्यासाठी भूसंपादन शेतकºयांवर लादले जात असल्याचा आरोप करीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार, भूसंपादन अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी अर्ज करीत येथील शेतकºयांनी भूसंपादनाला विरोध दर्शविला, तसेच गुंठाभरही जमीन देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले; परंतु सरकारने याबाबत कोणतीही दखल घेतली नाही.
जेजुरी एमआयडीसीच्या विस्तारात नावळी येथील अनेक शेतकºयांची जमीन जाणार आहे. सरकारने नोकरीचे, तसेच आर्थिक मोबदला देण्याचे मान्य केले; परंतु बागायती जमिनी देणे बेकायदेशीर असतानाही अशा जमिनींचे भूसंपादन करण्यात येत आहे. बड्या आजी-माजी राजकीय पुढाºयांनी या भागात मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी केल्या आहेत. येथील भूसंपादन झाल्यावर हे पुढारी करोडपती होणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत भूसंपादन होण्यासाठी धडपड पाहायला
मिळत आहे.

टप्पा क्रमांक ५’चे भूसंपादन सुरू असून सध्या लोकशाही की हुकूमशाही सुरू आहे, हेच समजत नाही. आम्ही गरिबांनी काय करावे? शासनाकडून दखल घेतली जात नाही. आम्ही एक गुंठाही जागा देणार नाही. आम्ही जगणार कसे? मुलेबाळे जाणार कुठे? शेवटी चोरी करण्याची वेळ आमच्यावर येऊ नये म्हणजे झाले. आमची काळी आई आम्हाला भाजी-भाकरी देते, ती हिसकावून घेऊ नका.
- गेनबा म्हस्के, माजी सरपंच, नावळी

Web Title: Hundreds of farmers will be subjected to marshy land acquisition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.