दीडशे जणांवरच भार

By admin | Published: December 29, 2014 01:11 AM2014-12-29T01:11:10+5:302014-12-29T01:11:10+5:30

शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता अग्निशमन यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस आगीच्या घटनाही वाढत आहेत

Hundreds of people | दीडशे जणांवरच भार

दीडशे जणांवरच भार

Next

पिंपरी : शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता अग्निशमन यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस आगीच्या घटनाही वाढत आहेत. अशातच ७५० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. फक्त १५० कर्मचाऱ्यांवर अग्निशमन विभागाचे कामकाज सुरू आहे.
आपत्कालीन समस्येतून मार्ग काढणारा महत्वाचा विभाग म्हणजे अग्निशमन दलाकडे पाहिले जाते. मात्र, याच विभागात १९८५ पासून जागा भरल्या नाहीत. कर्मचाऱ्यांअभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अग्निशमन दलाकडून ३५ कोटीचे उत्पन्न पालिकेला मिळत असतानाही प्रशासनाकडून या विभागाकडे दुर्लक्ष होत आहे.
शहराचा विस्तार होत असताना अग्निशमन दलाचाही ताण वाढत चालला आहे. आळंदी, तळेगाव, जुन्नर या ठिकाणी अग्निशमनाच्या गाड्या उपलब्ध असतानाही पिंपरी-चिंचवड विभागातून गाड्या बोलवल्या जातात. यामुळे कामावरचा ताण वाढलेला दिसून येत आहे. शहरात एकूण भोसरी, रहाटणी, प्राधिकरण व पिंपरी अशी चार केंद्र आहेत. शहरातील शासकीय इमारती, दवाखाने, शाळा सर्व ठिकाणी अग्निशामक दलाने विहीत मानांकाप्रमाणे आग विझवण्याची यंत्रणा कार्यरत केलेली आहे.
मात्र खासगी शाळा, दवाखाने अथवा इमारती या ठिकाणीही अग्निशमन यंत्रणा कार्यरत असणे गरजेचे आहे. ही जबाबदारी बिल्डर अथवा सोसायटीची आहे. अग्निशमन दलाच्या वतीने खासगी ठिकाणी प्रशिक्षण देण्याचे काम नाममात्र शुल्क दरात दिले जाते. अशा ठिकाणी परवानाधारक एजन्सीकडून ही अग्निशमण यंत्रणेची तपासणी केली जाते. मात्र, रहिवासी इमारतीना अग्निशामक यंत्रणा वापरताना दिसून येत नाही.
जिवित व वित्त हानी वाचविणे, आपत्कालीन व्यवस्थापन व अग्निशामनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे ही अग्निशमन विभागाची कामे असतात.
पायाभूत सोईसुविधा, तसेच अग्निशमन दलाकडे वाहनसंख्याही अपुरी आहे. अग्निशमन विभागाकडे सध्या आग विझवण्यासाठी १० वाहने आहेत, मात्र ही यंत्रणा अपुरी पडत आहे. अग्निशमन वाहनांची संख्या दुपटीने वाढविणे गरजेचे आहे. अग्निशामन अधिकारी, मुख्य अधिकारी ही पदे भरणे गरजेचे
आहे. फायरमनची पदे सध्या ९५ आहेत. आणखी २५० जागांची आवश्यकता आहे. आगीच्या घटनाबरोबरच झाडे पडणे, इमारती कोसळणे, गॅस लिकेज, प्राणी संकटात सापडणे आदी घटनांतही अग्निशमनदलाला धाव घ्यावी
लागत आहे. आपत्कालीन संकटाचा सामना करत असताना मात्र अग्निशमन दलाकडेच पालिके चे दुर्लक्ष झाले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Hundreds of people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.