टोल बंद प्रकरणी शरद सोनवणे यांच्यासह शंभरजणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:11 AM2021-04-04T04:11:38+5:302021-04-04T04:11:38+5:30
पुणे - नाशिक महामार्गावर चाळकवाडी येथील टोलनाका बंद करण्यासाठी गेलेले जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांच्यसह शंभर कार्यकर्त्यांवर ...
पुणे - नाशिक महामार्गावर चाळकवाडी येथील टोलनाका बंद करण्यासाठी गेलेले जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांच्यसह शंभर कार्यकर्त्यांवर कोव्हीडचे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शंभर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुणे नाशिक महामार्गावर चाळकवाडी येथे टोलनाका असून हा टोलनाका दिनांक १५ जुलै २०१८पासून बंद आहे. हा बंद असलेला टोलनाका एक एप्रिलला पुन्हा सुरु करण्यात येणार होता. मात्र विविध मागण्यांसाठी जुन्नरचे माजी आमदार सोनवणे, नारायणगावचे सरपंच बाबूभाऊ पाटे, पिंपळवंडीचे उपसरपंच प्रदीप चाळक, आनंदभाऊ रासकर आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रात्री बारा वाजता हा टोल बंद केला. त्यानंतर शुक्रवारी ( दि २) आळेफाटा पोलिसांनी कोव्हीडच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शरद सोनवणे ,सरपंच बाबुभाऊ पाटे, आनंदभाऊ रासकर यांच्यासह शंभर कार्यकर्त्यांवर बाबतची फिर्याद पोलिस काॅन्स्टेबल अशोक फलके यांनी दिली आहे.
दरम्यान, माजी आमदार सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगीतले की जोपर्यंत पुणे नाशिक महामार्गाचे काम पुर्ण होत नाही तोपर्यंत चाळकवाडी येथील टोल नाका चालु करू देणार नाही. तसेच या हायवेच्या रस्त्यामध्ये ज्या ज्या शेतक-यांच्या जमीणी गेल्या आहेत त्यांच्या तसेच स्थानिक युवकांना या टोल नाक्यावर रोजगार मिळाला पाहीजे. यामुळे शेतक-यासाठी माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी चालतील.