बहुळ येथे शंभर जणांनी घेतली कोविड लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:12 AM2021-04-09T04:12:04+5:302021-04-09T04:12:04+5:30
याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे, अॅड. सुखदेव पानसरे, उपसरपंच बेबीताई वाडेकर, पोलीस पाटील अॅड. केशव साबळे, महात्मा गांधी ...
याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे, अॅड. सुखदेव पानसरे, उपसरपंच बेबीताई वाडेकर, पोलीस पाटील अॅड. केशव साबळे, महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गुलाब वाडेकर, माजी उपसरपंच अंकुश साबळे, पूजा पानसरे, रुपाली खलाटे, अर्चना शेंडे, ग्रामविकास अधिकारी बी. आर. मतकर, डॉ. तेजस्विनी पाटील, माजी चेअरमन नानासाहेब खलाटे, आरोग्यसेविका दुबे आदींसह अन्य आशा वर्कर, ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, बहुळ, सिद्धेगव्हाण व साबळेवाडी गावांतील ४५ वर्षांपुढील शंभराहून अधिक लाभार्थ्यांना कोविड लस देण्यात आली. लसीकरणासाठी गावातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
--
०८शेलपिंपळगाव लसीकरण
फोटो ओळ : बहुळ (ता. खेड) येथे कोविड लसीकरण मोहिमेची पाहणी करताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे.