बंद पीएमपी बसचे सुटेना ग्रहण, पीएमपीच्या शेकडो गाड्या वर्कशॉपमध्येच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 02:31 AM2018-08-14T02:31:36+5:302018-08-14T02:31:46+5:30

आरटीओ पासिंग, देखभाल-दुरुस्ती, अपघात अशा विविध कारणांमुळे शेकडो बस वर्कशॉपमध्येच उभ्या आहेत. बंद बसचे हे ग्रहण सुटता सुटत नसल्याने दररोज पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) मालकीच्या सुमारे ४५०, तर भाडेतत्त्वावरील १५० हून अधिक बस मार्गावर येत नाही.

hundreds of PMP bus workshop | बंद पीएमपी बसचे सुटेना ग्रहण, पीएमपीच्या शेकडो गाड्या वर्कशॉपमध्येच

बंद पीएमपी बसचे सुटेना ग्रहण, पीएमपीच्या शेकडो गाड्या वर्कशॉपमध्येच

Next

पुणे : आरटीओ पासिंग, देखभाल-दुरुस्ती, अपघात अशा विविध कारणांमुळे शेकडो बस वर्कशॉपमध्येच उभ्या आहेत. बंद बसचे हे ग्रहण सुटता सुटत नसल्याने दररोज पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) मालकीच्या सुमारे ४५०, तर भाडेतत्त्वावरील १५० हून अधिक बस मार्गावर येत नाही. त्यात ब्रेकडाऊनची भर पडत असल्याने प्रवाशांना सक्षम सेवा पुरविण्यात प्रशासनाला सातत्याने अपयश येत आहे.
‘पीएमपी’च्या ताफ्यात सुमारे २१०० बस असून, त्यामध्ये भाडेतत्त्वावरील ६५३ बसेसचा समावेश आहे. पीएमपीच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, रविवारी २२ हजार ४१६ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी केवळ १८ हजार ४८१ फेºया होऊ शकल्या. तसेच मार्गावर १७८० बस सोडण्याचे नियोजन असताना केवळ १३७७ बस येऊ शकल्या. सोमवारच्या (दि. १३) स्थितीमध्ये त्यात काहीशी सुधारणा झाल्याचे दिसले. या दिवशी सुमारे १५०० बस मार्गावर आणण्यात आल्या असून, मागील काही दिवसांतील हा सर्वोच्च आकडा असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. त्यामध्ये भाडेतत्त्वावरील ४९० गाड्यांचा, तर पीएमपीच्या मालकीच्या केवळ १००८ गाड्यांचा समावेश आहे. जवळपास ६०० गाड्या सोमवारी मार्गावर आल्या नाहीत.
एकुण बंद गाड्यांमध्ये आरटीओ पासिंगच्या गाड्यांची संख्या सर्वाधिक आहे. दि. ६ आॅगस्टच्या आकडेवारीनुसार, पीएमपीच्या मालकीच्या २८ बस आरटीओ पासिंगसाठी सज्ज होत्या. तर १२८ बसेसचे पासिंगसाठीचे काम सुरू होते. पीएमपीचे पासिंगचे काम दररोज होत नाही. त्यामुळे या बसेसच्या संख्येत दररोज वाढ होते. हे काम दररोज झाल्यास पासिंग अभावी सुमारे १५० बस बंद राहणार नाहीत, असे अधिकाºयांचे म्हणणे आहे. पासिंगशिवाय देखभाल-दुरूस्तीच्या कामासाठी या दिवशी ७४ बस बंद होत्या. तर भांडार विभागाकडे बसेससाठी आवश्यक साहित्य नसल्याने ४६ बस बंद ठेवाव्या लागल्या. अपघात, तोडफोड किंवा इतर कारणांमुळे नुकसान झालेल्या ४५ बस असून त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू होते. तर ३८ बस मार्गावर येण्याच्या अवस्थेत नाहीत. या दिवशी ४१२ बस अशा विविध कारणांमुळे बंद राहिल्या. या बंद बसेसमध्ये सोमवारी (दि. १३) तब्बल ९० बसेसची भर पडली. भाडेतत्वावरील १६३ गाड्या बंद होत्या.

‘ब्रेकडाऊन’ची भर

एकीकडे सुमारे ५०० बस मार्गावर येत नसताना मार्गावर आलेल्या बसपैकी दररोज शंभरहून अधिक बसचे ब्रेकडाऊन होते. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. ब्रेकडाऊन झालेल्या बसपैकी काही बस जागेवरच दुरुस्त करून पुन्हा मार्गावर आणल्या जातात. तर अनेक बसला थेट वर्कशॉपमध्ये न्यावे लागते. त्यामुळे या बस दिवसभरात पुन्हा मार्गावर येत नाहीत. त्याचा पीएमपीच्या संबंधित मार्गावरील वेळापत्रकावर परिणाम होऊन प्रवाशांना खचाखच भरलेल्या बसमधून प्रवास करावा लागत आहे.

‘पीएमपी’च्या विनंतीनुसार बसच्या पासिंगसाठी दिवस निश्चित केला जातो. त्या वेळी अधिकारीही उपलब्ध करून दिले जातात. काही दिवसांपूर्वीच ५५ बसच्या पासिंगचे काम करण्यात आले. तसेच तपासणीसाठी आलेल्या बहुतेक बसमध्ये त्रुटी आढळत नाहीत. त्यामुळे पासिंगचे प्रमाणही चांगले आहे.
- संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे विभाग

Web Title: hundreds of PMP bus workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.