रेल्वे स्टेशन मास्तरांचे अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:10 AM2021-01-22T04:10:52+5:302021-01-22T04:10:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रात्रपाळीच्या सिलिंग मर्यादेचा आदेश रद्द करावा, रेल्वेचे खाजगीकरण व कंत्राटीकरण बंद करावे, जुनी पेन्शन ...

The hunger strike of the railway station masters | रेल्वे स्टेशन मास्तरांचे अन्नत्याग आंदोलन

रेल्वे स्टेशन मास्तरांचे अन्नत्याग आंदोलन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : रात्रपाळीच्या सिलिंग मर्यादेचा आदेश रद्द करावा, रेल्वेचे खाजगीकरण व कंत्राटीकरण बंद करावे, जुनी पेन्शन याेजना लागू करावी, काेराेना काळात काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा कवच द्यावे आदी मागण्यांसाठी रेल्वे स्टेशन मास्तर असोसिएशनने गुरुवारी (दि. २१) अन्नत्याग आंदोलन केले. या मागण्या मान्य केल्या नाहीत तर तर पुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा त्यांनी स्टेशन मास्तरांनी दिला.

पुणे स्टेशनजवळील रेल मंडल कार्यालय (डीआरएम ऑफीस) येथे आंदोलन झाले. असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे, मंडल अध्यक्ष अमित वर्मा, मंडल सचिव शकील इनामदार, दिनेश कांबळे, एस. के. मिश्रा, अजय सिन्हा, अर्जुन कुमार, प्रल्हाद कुमार, मैथ्यू जॉर्ज, जे. आर. तांडले, सुनील गुप्ता, मनाली कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.

चंद्रात्रे म्हणाले की, देशातील स्टेशन मास्तरांच्या ऑल इंडिया स्टेशन मास्तर असोसिएशनच्या (एआयएसएमए) वतीने देशभर हे आंदोलन झाले. रेल्वे प्रशासन स्टेशन मास्तरांच्या मागण्यांची दखल घेत नाही. उपोषण, विनंत्या-अर्ज करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. प्रशासनाने सप्टेंबरमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार देशातील रात्रपाळी करणाऱ्या स्टेशन मास्तर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात कपात करण्याचे आदेश दिले.

यापूर्वी रात्रपाळीकरिता स्टेशनच्या दर्जानुसार ८ ते २४ टक्के भत्ता दिला जात हाेता. मात्र आता ४३ हजार ६०० रुपये बेसिक सिलिंग मर्यादा ठेवल्याने त्यापेक्षा अधिक पगार असलेल्यांचा भत्ता कमी हाेणार आहे. त्याचप्रमाणे मार्च २०१८ मध्ये रेल्वे प्रशासनाने आदेश काढून काेणतेही कारण नसताना १ जुलै २०१७ पासून ज्यांना संबंधित मर्यादेपेक्षा अधिक भत्ता दिला गेला आहे, ते पैसे वळते करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अन्यायकारक असून, तो त्वरीत परत घ्यावा, ही आमची मागणी मुख्य मागणी आहे.

Web Title: The hunger strike of the railway station masters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.