मोरांवर उपासमारीची वेळ
By admin | Published: August 4, 2015 03:52 AM2015-08-04T03:52:31+5:302015-08-04T03:52:31+5:30
खेड तालुक्याच्या पूर्व भागात राष्ट्रीय पक्षी मोर अन्नपाण्याच्या शोधात मानवी वस्तीत येऊ लागला आहे. पाऊस नसल्यामुळे मोरांवर
दावडी : खेड तालुक्याच्या पूर्व भागात राष्ट्रीय पक्षी मोर अन्नपाण्याच्या शोधात मानवी वस्तीत येऊ लागला आहे.
पाऊस नसल्यामुळे मोरांवर उपासमारीची वेळ आली असून, या परिसरात मोरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पूर्व भागातील वरुडे या परिसरात जंगलात असंख्य मोर आहेत. तसेच वेळू नदीकाठी मोरांची संख्या जास्त आहे.
सध्या या परिसरात पाऊस नसल्यामुळे शेतातील पिके खाण्यास मिळत नाहीत. अन्नपाण्याच्या शोधात मोर मानवी वस्तीकडे येऊ लागले आहेत. शेतकरी अंगणात आलेल्या मोरांना खाण्यास धान्य टाकत आहेत. मोर माणसाळले आहेत.
वरुडे येथील वाळुंजवस्ती येथे मोर अंगणात, घरावर, झाडावर वास्तव्यास आहेत. पाऊस येण्याच्या वेळी मोर थुई थुई नाचून पिसारा फुलवून नाचत असतो. या परिसरात पावसाने ओढ दिल्याने व अन्न-पाणी न मिळाल्याने मोर सैरावैरा झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.