कलावंत रसिकांच्या टाळ्यांचा भुकेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:15 AM2021-03-04T04:15:47+5:302021-03-04T04:15:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कलावंतांना रसिक हवे असतात, रसिकांच्या टाळ्या हव्या असतात. सध्याच्या परिस्थितीमुळे घरी बसावे लागलेल्या कलावंताची ...

Hungry for the applause of the artist aficionados | कलावंत रसिकांच्या टाळ्यांचा भुकेला

कलावंत रसिकांच्या टाळ्यांचा भुकेला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कलावंतांना रसिक हवे असतात, रसिकांच्या टाळ्या हव्या असतात. सध्याच्या परिस्थितीमुळे घरी बसावे लागलेल्या कलावंताची अवस्था जेलमधील कैद्यासारखी झाली आहे, अशी भावना ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार यांनी व्यक्त केली.

भरत नाट्य संशोधन मंदिर निर्मित आणि संजय डोळे लिखित-दिग्दर्शित ‘पुन्हा सौजन्य’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रविवारी (दि. 28) भरत नाट्य मंदिरात झाला. या प्रयोगाला ‘सौजन्याची ऐशी तैशी’ या नाटकात ‘पारूबाई’ ही भूमिका साकारलेल्या इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती. नाट्यप्रयोगादरम्यान त्यांनी रसिकांशी संवाद साधला. नाटकाचे संगीतकार प्रसिद्ध गायक चंद्रशेखर महामुनी उपस्थित होते.

आठवणींना उजाळा देताना इनामदार म्हणाल्या, ‘पुन्हा सौजन्य’ हे नाटक बघताना ‘सौजन्याची ऐशी तैशी’ या नाटकाच्या आठवणी जाग्या झाल्या. ते नाटक करीत असताना राजा गोसावी यांच्याकडून खूप शिकायला मिळाले. प्रकाश इनामदार हे पती असले तरी नाट्यक्षेत्रातील ते माझे पहिले गुरू आहेत. मूळ कलाकृतीला धक्का न लावता ‘पुन्हा सौजन्य’ साकारणार्‍या कलाकारांचे त्यांनी कौतुक केले.

सुरुवातीस चंद्रशेखर महामुनी यांचा सत्कार गायक-अभिनेता संजीव मेहेंदळे यांनी केला. जयमाला शिलेदार यांचा सत्कार संजय डोळे आणि पूजा गिरी यांनी केला. भरत नाट्य मंदिराचे कार्याध्यक्ष अभय जबडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

या नाटकात संजय डोळे यांच्यासह पूजा गिरी, रोमा गिरी, विश्वास पांगारकर, वंदन गरगटे, प्रदिप कुलकर्णी, अक्षय आठवले, विशाल बावणे, इरा जोशी यांच्या भूमिका आहेत. सुप्रसिद्ध गायक चंद्रशेखर महामुनी यांनी नाटकाला संगीत दिले आहे तर नेपथ्य विश्वास पांगारकर यांचे आहे.

....

Web Title: Hungry for the applause of the artist aficionados

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.