हुरडा पार्ट्यांचा व्यवसाय जोरात

By Admin | Published: December 29, 2014 11:26 PM2014-12-29T23:26:12+5:302014-12-29T23:26:12+5:30

बारामती तालुक्याच्या जिरायती भागात हुरडा पार्ट्या जोरात सुरू आहेत. शेतावरच पार्ट्या करण्यावर भर देत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

Hurada Parties business loud | हुरडा पार्ट्यांचा व्यवसाय जोरात

हुरडा पार्ट्यांचा व्यवसाय जोरात

googlenewsNext

काऱ्हाटी : बारामती तालुक्याच्या जिरायती भागात हुरडा पार्ट्या जोरात सुरू आहेत. शेतावरच पार्ट्या करण्यावर भर देत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
जिल्ह्यातून तसेच तालुक्यातून तरुण-तरुणींचे प्रमाण जास्त आहे. यंदा बहुतांश भागातील पिके हुरड्यात आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी हुरड्याचा स्वाद घेत आहेत. रोजच्या धकाधकीच्या दिनक्रमातून सुट्टीच्या दिवशी निवांत क्षण शोधण्यासाठी सतत नवनवीन जागा शोधणाऱ्या शहरी पर्यटकांमध्ये हुरडा पार्टीची आवड आहे. सध्या बारामती-मोरगाव रस्त्यालगत ज्वारीच्या शिवारांमध्ये हुरडा पार्ट्या रंगताना दिसत आहेत. त्यासाठी शहरातून स्वतंत्र वाहन व्यवस्थेद्वारे हुरडा पार्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक बारामतीच्या जिरायती भागात पोहोचत आहेत.
ग्रामीण भागातील हुरडा पार्टीचे बुकिंग जोरात सुरू आहे. दर वर्षी नोव्हेंबरअखेर ते जानेवारी या काळात हुरडा पार्ट्या आयोजित केल्या जातात. पूर्वी लोक परिचयाच्या एखाद्या व्यक्तीच्या शेतात हुरडा खायला जायचे. ज्वारीच्या शिवारांमध्येच हुरडा पार्ट्या आयोजित केल्या जातात. बारामती शहराबरोबरच पुण्यातील पर्यटकांचा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यत: सुट्ट्यांच्या दिवशी जास्त गर्दी असते. आम्ही पर्यटकांना गरम गरम हुरडा, जोडीला लसूण-खोबरे, शेंगदाणा चटणी, सेंद्रिय गूळ, गोड दही असे दुपारी खायला देतो. थंडीच्या आल्हाददायक वातावरणात नेहमीच्या जेवणात बदल म्हणून लोक कृषी पर्यटन केंद्राला प्राधान्य देत आहेत. त्यामुळेच हुरडा पार्ट्यांना मागणी वाढली आहे. (वार्ताहर)

बुकिंग जोरात सुरू
४ सध्या बारामती-मोरगाव रस्त्यालगत ज्वारीच्या शिवारांमध्ये हुरडा पार्ट्या रंगताना दिसत आहेत. त्यासाठी शहरातून स्वतंत्र वाहन व्यवस्थेद्वारे हुरडा पार्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक बारामतीच्या जिरायती भागात पोहोचत आहेत.
४ ग्रामीण भागातील हुरडा पार्टीचे बुकिंग जोरात सुरू आहे. दर वर्षी नोव्हेंबरअखेर ते जानेवारी या काळात हुरडा पार्ट्या आयोजित केल्या जातात. पूर्वी लोक परिचयाच्या एखाद्या व्यक्तीच्या शेतात हुरडा खायला जायचे. ज्वारीच्या शिवारांमध्येच हुरडा पार्ट्या आयोजित केल्या जातात.

Web Title: Hurada Parties business loud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.