भिगवण चौक ते इंदापूर चौकापर्यंत अडथळ्यांची शर्यत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 05:06 AM2018-04-23T05:06:53+5:302018-04-23T05:06:53+5:30

भिगवण चौकातील हुतात्मा स्तंभ स्थलांतरित करण्याचा अट्टहास असणाºया नगरपालिकेच्या पदाधिाकरी, नगरसेवकांना हा प्रश्न सुटत नाही.

Hurdles race from Bhigavana Chowk to Indapur Chowk | भिगवण चौक ते इंदापूर चौकापर्यंत अडथळ्यांची शर्यत

भिगवण चौक ते इंदापूर चौकापर्यंत अडथळ्यांची शर्यत

googlenewsNext

बारामती : बारामती शहरातील भिगवण चौक ते इंदापूर चौकापर्यंत अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागते. दुचाकी पार्किंगच्या ठिकाणी चारचाकी गाड्या दिवसभर उभ्या असतात. त्यातच व्यापाऱ्यांचा माल घेऊन आलेल्या गाड्यांमधील माल उतरविण्याचे काम सुरू असते. चारचाकी वाहनचालक अगदी सहजपणे रस्त्यावरच गाडी लावून जातो. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. छत्रपती शिवाजीमहाराज मार्गावर सतत वर्दळ असते. त्यातून बाहेर पडताना नागरिकांना नाकीनऊ येते.
भिगवण चौकातील हुतात्मा स्तंभ स्थलांतरित करण्याचा अट्टहास असणाºया नगरपालिकेच्या पदाधिाकरी, नगरसेवकांना हा प्रश्न सुटत नाही. चौकातील जुना व्यापार संकुलाचा अर्धा भाग पाडून वाहतुकीची कोंडी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, संबंधित जागेचा प्रश्न निर्माण झाला. त्यातून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी उपोषण आंदोलन केले. त्यामुळे अर्धवट काम झाले आहे. जिल्हाधिकाºयांनी त्याला स्थगिती दिली. याच पार्श्वभूमीवर गाळे मूळ गाळेधारकांना परत करण्यात आले. त्यांचे दुकानाचे बोर्ड लावण्यात आले. परंतु, रस्त्यावर पडलेला राडारोडादेखील ठेकेदाराने अथवा नगरपालिकेने उचलला नाही. त्यामुळे मूळ उद्देशच बाजूला राहिला आहे. छत्रपती शिवाजीमहाराज रस्त्यावर कमालीची अतिक्रमणे आहेत. इंदापूर चौकाची (अहिल्यादेवी चौक) वेगळी परिस्थिती नाही. चौकातच भयानक स्थिती आहे. या चौकातून दोन्ही बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि गणेश मंडई गुणवडी चौकातून चालणेदेखील मुश्कील होते. हा मार्ग शहरातून जाणारा राज्यमार्ग आहे.

मंडईचा बहुमजली पार्किंग तळ बंदच...
1येथील पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी बारामती नगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून बहुमजली मंडई बांधली. त्याचे आॅक्टोबर २०१७ मध्ये उद्घाटन झाले. या इमारतीत चारचाकी आणि दुचाकी गाड्या पार्किंगसाठी वाहनतळ बांधला आहे. मात्र, उद्घाटनानंतर मागील सहा महिन्यांपासून वाहनतळ बंदच ठेवण्यात आला आहे. वाहनतळ ‘पे अ‍ॅन्ड पार्क’ आहे. या तत्त्वावर खुला करण्याचा प्रस्ताव आहे.

2या प्रस्तावाची मान्यता येईपर्यंत नागरिकांना सुरुवातीच्या काळात मोफत वाहनतळ उपलब्ध करून द्या, अशी नगरसेवकांची मागणी होती. त्यामध्ये राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांच्या नगरसेवकांचा समावेश आहे. मात्र त्याला ज्येष्ठांनी विरोध केला. त्यामुळे मंडई समोरील वाहतुकीची समस्या जैसे थे आहे. मंडईच्या गाळेवाटपाचे कामदेखील थांबले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मंडईसमोरील वाहतूक व्यवस्था कठीण होत आहे.
 

Web Title: Hurdles race from Bhigavana Chowk to Indapur Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.