तौक्ते चक्रीवादळाने नुकसान जाता-जाता टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:11 AM2021-05-18T04:11:01+5:302021-05-18T04:11:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गतवर्षी जून महिन्यात झालेल्या चक्रीवादळाच्या तुलनेत रविवार-सोमवारी झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने जिल्ह्यात कमी नुकसान झाले. ...

The hurricane avoided damage | तौक्ते चक्रीवादळाने नुकसान जाता-जाता टळले

तौक्ते चक्रीवादळाने नुकसान जाता-जाता टळले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गतवर्षी जून महिन्यात झालेल्या चक्रीवादळाच्या तुलनेत रविवार-सोमवारी झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने जिल्ह्यात कमी नुकसान झाले. घराच्या पडझडीत तीन लोक किरकोळ जखमी झाले तर खेड, मुळशी, भोर, मावळ आणि आंबेगाव तालुक्यात घरांची, काही ठिकाणी शाळा, अंगणवाडी आणि ग्रामपंचायत कार्यालयाचे पत्रे उडाले १९० ठिकाणी पडझड झाली. दरम्यान या चक्रीवादळाचा फळबागांना फटका बसला आहे. तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

अरबी समुद्रात निर्माण झालेलं आणि अतितीव्र स्वरुपाच्या तौक्ते चक्रीवादळाचा पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व तालुक्याना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. रविवार (दि.१६) आणि सोमवार (दि.१७) रोजी जिल्ह्यातील काही तालुक्यात या चक्रीवादळाचा चांगला परिणाम दिसून आला. परंतु, गतवर्षी जून महिन्यात झालेल्या चक्रीवादळात जीवीतहानीसह हजारो घरांचे, लाईटचे खांब, शाळा, अंगणवाड्या, ग्रामपंचायत कार्यालये, पोल्ट्री फार्म, पाॅलीहाऊस यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळेच हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर तौक्ते चक्रीवादळाच्या इशाऱ्यानंतर लोकांमध्ये धास्तीचे वातावरण होते. परंतु, या वादळात फारसे नुकसान झाले नाही. अद्याप पूर्ण धोका टळला नाही. मंगळवार दुपारपर्यंत सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान, शिरूर तालुक्यात १ घराची पडझड झाल्याने २ व्यक्ती यात फिरकोळ जखमी झाल्या आहेत. प्राथमिक उपचारानंतर घरी सोडून दिले. तर खेड तालुक्यात एका घराची पडझड झाल्याने व्यक्ती जखमी झाल्याने या व्यक्तीस प्राथमिक उपचारानंतर घरी सोडलेले आहे. बारामती तालुक्यातील विद्युत वाहिनीचा शॉक बसल्याने २ शेळ्या व २ मेंढ्या मयत झाल्या. मुळशी तालुक्यामध्ये खांबोली गावातील जि. प. प्राथमिक शाळेचे पत्रे उडाल्याने नुकसान झालेले आहे.

पंचनामे करण्याचे आदेश

ताम्हिणी गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयाचे पत्रे उडाले. खेड तालुक्यातील दिवेगाव गावातील एक प्राथमिक शाळाचे संपूर्ण पत्र उडून गेले, भोरगिरी गावातील ग्रामपंचायत व दोन आंगणवाडी यांचे पत्रे उडून गेले. सद्य:स्थितीत घाटमाथा परिसरामध्ये पाऊस पडत आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून अंतिम आकडेवारी दोन दिवसांत निश्चित होईल, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी सांगितले.

------

घरांची अशी झाली पडझड

मुळशी -७५, भोर-०९, मावळ-१०, खेड-९५, आंबेगाव-०१.

Web Title: The hurricane avoided damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.