नारायणगाव परिसरात चक्रीवादळाचा तडाका
By admin | Published: May 1, 2017 02:11 AM2017-05-01T02:11:38+5:302017-05-01T02:11:38+5:30
नारायणगाव ,वारूळवाडी परिसरात आज (दि ३०)सांयकाळी सुमारास झालेल्या चक्री वादळामुळे संपूर्ण परिसर
नारायणगाव : नारायणगाव ,वारूळवाडी परिसरात आज (दि ३०)सांयकाळी सुमारास झालेल्या चक्री वादळामुळे संपूर्ण परिसर धुळीच्या वादळाने माखून गेला होता, तर पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक ठप्प सेवा विस्कळीत होऊन वाहतूक कोंडी झाली होती ,अनेक ठिकाणी झाडांच्या मोठमोठ्या फांद्या पडल्या. अनेक जणांच्या अंगावर झाडाच्या फांद्या पडल्याने नाारायणगाव येतील व्यापारी अजय रामेश्वर भुतडा (वय ५४) हेगंभीर जखमी झाले आहेत . त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत . तर अन्य दोन जण जख्मी झाले.
आज सायंकाळी ७ वा च्या सुमारास अचानक चक्री वादळ सुरु झाले असता महामार्गावरील फ्लेक्स चे बोर्ड ,नारायणगाव एसटी बस स्थानक मोठमोठे जाहिरातीचे लोखंडी बोर्ड वादळाने पडले आहेत . या मध्ये आळेकर मार्केट व बस स्थानकातील दोन बोर्ड पडले . दोन महिलांनी प्रसंगावधान राखल्याने त्या वाचायला अन्यथा गंभीर दुर्घटना घडली असती .
कपड्याचे व्यापारी अजय भुतडा हे बाईक वरुन घरी जात असताना त्यांच्या व सुरेश पडघम यांच्या अंगावर मोठी फांदी पडलली यामध्ये भुतडा यांच्या डोक्याला गंभीर जखम होऊन मानेला झटका बसला आहे .९ टाके पडले आहेत. त्यांच्यावर थोरात हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर पुण्याला हलविण्यात आले आहे . बोरकर यांच्या शेवंताई पेट्रोल पंपासमोर सुनील खैरे यांच्या अंगावर फ्लेक्स बोर्ड पडल्याने त्यांच्या डोक्याला व खांद्याला मर लागला आहे . वारूळवाडी येथील व्यावसायिक जयंतीलाल सुराणा यांच्या अंगावर बोर्ड पडल्याने ते सुमारे 30 मिनिटे बेशुद्ध होते . त्यांना मानेला व पाठीला मार बसला आहे. दरम्यान, वादळामुळे ठिकठिकाणी विद्युत पोल पडले असुन ७ वा. पासून वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे.आळेकर मार्केट परिसरातील उभे असलेले जाहिरातीचे मोठ्मोठे फ्लेक्सचे बोर्ड या वादळात जमीन दोस्त झाले आहेत.जमिनीपासून दोन महिला बचावल्या.सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभे असणारे अनेक मोठे छोटे बोर्ड पडले आहेत. अनेक सोसायटी मध्ये व परिसरात असणा?्या झाडांच्या मोठमोठ्या फांद्या पडल्या आहेत.