तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा! बारामतीत ३ लाख पेक्षा जास्त ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 07:02 PM2021-05-16T19:02:09+5:302021-05-16T19:02:16+5:30

महावितरणाची ४८ उपकेंद्र बाधीत, अखंडित वीजपुरवठ्यासाठी कर्मचाऱ्यांची कसरत

Hurricane Taukte hits! Power supply to more than 3 lakh customers disrupted in Baramati | तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा! बारामतीत ३ लाख पेक्षा जास्त ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत

तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा! बारामतीत ३ लाख पेक्षा जास्त ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत

Next
ठळक मुद्देनैसर्गिक आपत्तीशीही दोन हात करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांनी काही तासांतच ४४ उपकेंद्र व 3 लाख ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला

बारामती: कोरोनासारख्या भीषण आपत्तीसोबत लढणाऱ्या महावितरणाला आता ‘तौक्ते चक्रीवादळा’चा तडाखा बसला आहे. चक्रीवादळाने बारामती परिमंडलात महावितरणचे ४८ उपकेंद्र बाधीत झाले असून, घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिकसह ३ लाख ४२ हजार ३८५ ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र नैसर्गिक आपत्तीशीही दोन हात करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांनी काही तासांतच ४४ उपकेंद्र व ३ लाख ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला आहे. तर कोव्हीड रुग्णालये, कोवीड केअर सेंटर्स, ऑक्सिजन निर्मिती केंद्रे यांच्या अखंडित वीजपुरवठ्यासाठी सर्व वीज यंत्रणा २४ तास कार्यरत आहे. 

पुणे, सोलापूर व सातारा जिल्ह्यात चक्रीवादळ येण्यापूर्वीच वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने वीज यंत्रणेला मोठा तडाखा दिला. बारामती परिमंडलात रविवारी दुपारपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ५४७ विजेचे खांब कोसळले. तर १८ हजार ७७३ रोहित्र बंद पडल्याने ८६९ गावांतील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र वीज कर्मचाऱ्यांनी अविरत परिश्रम घेऊन १५ हजार ३१९ रोहित्रांचा वीजपुरवठा पर्यायी मार्गाने पूर्ववत करुन बाधित पैकी ७९७ गावे सुरु झाली. तर उर्वरित गावामधीलही बहुतांश वीजपुरवठा पर्यायी मार्गाने सुरु करण्यात येत आहे.

वीजपुरवठा पूर्ववत करताना कोवीड हॉस्पीटल, कोवीड केअर सेंटर्स, ऑक्सिजन प्लान्ट, इतर सर्व रुग्णालये, लशीकरण केंद्रे, मोबाईल मनोरे, पाणी पुरवठा, रेल्वेसह सर्व अत्यावश्यक सेवा यांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे. संचालक (संचलन) संजय ताकसांडे व प्रभारी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांचे निर्देशानुसार मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी सर्व संबंधित विभागांना वादळानंतर पर्यायी मार्गाने तातडीने वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी साहित्य व मनुष्यबळ सदैव तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सर्व वीजपुरवठा कमीत वेळेत सुरळीत करण्यासाठी महावितरण यंत्रणा काम करत आहे.

Web Title: Hurricane Taukte hits! Power supply to more than 3 lakh customers disrupted in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.