तोक्ते चक्रीवादळाने पाॅलिहाऊसचे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:12 AM2021-05-26T04:12:12+5:302021-05-26T04:12:12+5:30
पुणे : जिल्ह्यात १६ आणि १८ मे रोजी आलेल्या तोक्ते चक्रीवादळात भोर, मावळ आणि वेल्हा तालुक्यातील ८१ पॉलीहाऊसचे नुकसान ...
पुणे : जिल्ह्यात १६ आणि १८ मे रोजी आलेल्या तोक्ते चक्रीवादळात भोर, मावळ आणि वेल्हा तालुक्यातील ८१ पॉलीहाऊसचे नुकसान झाले. याशिवाय शेती पिकांचे आणि अल्प प्रमाणात शेतजमिनीचे नुकसान झाले.
जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्याचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले होते. त्यानुसार महसूल यंत्रणेकडून हे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, त्यानुसार जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी पुणे यांचेकडून शेतीपिक व फळपीक नुकसान, शेतजमीन नुकसान, पॉलिहाऊस नुकसानभरपाईच्या अनुदानाबाबतची माहिती मागविण्यात आली. त्यानुसार नुकसानभरपाईचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने शासनाला पाठविण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने शेतीचे झालेले नुकसान, शेतपिकांचे नुकसान आणि पाॅलिहाऊस नुकसान असा अहवाल पाठविण्यात आला. शेतीचे केवळ भोर तालुक्यातील तीन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर शेतपिकांचे ९०१ शेतकऱ्यांचे व पॉलिहाऊसचे ८१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. परंतु एकूण नुकसान केवळ दोन ते अडीच कोटी रुपयांचे झाले आहे.