कागदपत्रांसाठी धांदल
By admin | Published: June 3, 2015 04:48 AM2015-06-03T04:48:14+5:302015-06-03T04:48:14+5:30
बारावीच्या निकालानंतर आपणास अपेक्षित वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष वर्गात प्रवेश मिळावा, यासाठी विद्यार्थ्यांचा खटाटोप सुरू झाला आहे
पिंपरी : बारावीच्या निकालानंतर आपणास अपेक्षित वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष वर्गात प्रवेश मिळावा, यासाठी विद्यार्थ्यांचा खटाटोप सुरू झाला आहे. तर प्रवेशासाठी लागणाऱ्या आवश्यक विविध कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी तहसील कचेरीमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांची धांदल
सुरू आहे.
बारावीचा निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थी आणि पालकांनी निवडलेल्या शाखा वर्गात प्रवेश मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. प्रवेशासाठी उत्पन्नाचा दाखला, आरक्षण आणि सवलतीसाठी गरजेचा असणारा जातीचा दाखला, तसेच सर्वांसाठी रहिवाशी दाखला आवश्यक आहे. त्यामुळे असे विविध दाखले मिळण्यासाठी महसूल विभागाकडे विद्यार्थी व पालकांची रिघ लागत आहे. असे दाखले आकुर्डी येथील तहसील कार्यालयाकडून दिले जात आहेत. जातीचा दाखला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिला जात असला, तरी नागरिकांसाठी आकुर्डीतील कार्यालयातूनही तो उपलब्ध केला जात आहे. (प्रतिनिधी)