Pune: कोयता दुसऱ्याला विकण्यावरुन पती-पत्नीने केले एकमेकांवर वार; पुणे शहरातील घटना

By विवेक भुसे | Published: July 1, 2023 02:54 PM2023-07-01T14:54:26+5:302023-07-01T15:01:35+5:30

कोयत्याची अशीही दहशत...

Husband and wife attacked each other for selling Koyta to someone else pune crime | Pune: कोयता दुसऱ्याला विकण्यावरुन पती-पत्नीने केले एकमेकांवर वार; पुणे शहरातील घटना

Pune: कोयता दुसऱ्याला विकण्यावरुन पती-पत्नीने केले एकमेकांवर वार; पुणे शहरातील घटना

googlenewsNext

पुणे : शहरात आपले वर्चस्व दाखविण्यासाठी छोट्या मोठ्या टोळ्यांकडून कोयत्याचा वापर होताना दिसतो. कोयता गँग म्हणून अनेक टोळ्या कुप्रसिद्ध झाल्या. पण कोयत्यावरुन कोणाची घरात भांडणे होतील असे कधी वाटले नसेल. कोयता दुसऱ्याला विकण्यावरुन पती-पत्नींमध्ये वाद झाला. तो इतका वाढला की त्यांनी त्याच कोयत्याने एकमेकांवर वार केले. दोघेही जखमी झाले. दोघांनी पोलिसांकडे एकमेकांविरुद्ध तक्रारी केल्या. पोलिसांनी दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत.

हा प्रकार मार्केटयार्ड येथील एका सोसायटीत २९ जून रोजी दुपारी दीड वाजता घडला. ३७ वर्षाच्या पतीचे नवी पेठेत सलून आहे. ते पत्नी व ७ वर्षाच्या मुलासह राहतात. त्यांच्याकडे चार दिवसांपूर्वी एक कुलकर्णी या नावाचे गृहस्थ आले होते. त्यांनी झाडे कापण्यासाठी कोयता किंवा कैची विकत मागितली. त्यांनी विकण्यास नकार दिला. पत्नीला घरात कोयता दिसल्याने तिने कोयता विकून टाका असे सांगितले. त्यावर पतीने कोणी कोयत्याचा गैरवापर केल्यास आपणास त्रास होईल, असे सांगितले. त्यावर पत्नीने तुम्हाला घरात भंगार ठेवायला का आवडते. पैसे मिळत असतील तर तुम्ही कोयता का विकत नाही, असे म्हणून वाद घातला. तिला समजावून सांगत असताना तिने हातातील कोयता मारला. पतीला खाली पाडून पत्नीने हाताने व लाथेने मारहाण केली, असे पतीने फिर्यादीत म्हटले आहे.

पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार, कोयता विकण्यावरुन त्यांच्या वाद झाल्यावर पत्नीने पतीला ठीक आहे, विकत नसणार तर कोयता माझ्या कामात येईल, असे म्हणाली. या बोलण्यावरुन पतीने तिला हाताने मारहाण केली. ती घराबाहेर जाण्यासाठी दाराची कडी उघडत असताना पतीने पाठीमागून येऊन तोच कोयता तिच्या डोक्यात मारला. ती ओरडत असताना पुन्हा तिच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले.

Web Title: Husband and wife attacked each other for selling Koyta to someone else pune crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.