महिलांना हनुमान मंदिरात जाण्यास मनाई असल्याचे म्हटल्याने पतीपत्नीला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:15 AM2021-04-30T04:15:04+5:302021-04-30T04:15:04+5:30

पुणे : जयंतीनिमित्ताने दर्शनासाठी हनुमान मंदिरात आलेली महिला पाहून ‘मंदिरात जाण्यास महिलांना मनाई आहे’ असे बोलल्याने राग आलेल्या तरुणाने ...

Husband and wife beaten for saying women are not allowed to go to Hanuman temple | महिलांना हनुमान मंदिरात जाण्यास मनाई असल्याचे म्हटल्याने पतीपत्नीला मारहाण

महिलांना हनुमान मंदिरात जाण्यास मनाई असल्याचे म्हटल्याने पतीपत्नीला मारहाण

Next

पुणे : जयंतीनिमित्ताने दर्शनासाठी हनुमान मंदिरात आलेली महिला पाहून ‘मंदिरात जाण्यास महिलांना मनाई आहे’ असे बोलल्याने राग आलेल्या तरुणाने पतीपत्नीला बांबुने मारहाण करून जखमी केले. हा प्रकार भवानी पेठेतील फकीर मोहम्मद सोसायटीखालील हनुमान मंदिरात २७ एप्रिलला घडला.

याप्रकरणी विशाल तुलसीदार जेदिया (वय ४०, रा. हार्मनी बिल्डिंग, वानवडी) यांनी खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी जित नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

जेदिया हे पूर्वी या ठिकाणी रहात होते. सध्या ते वानवाडीत रहात आहेत. हनुमान जंयतीनिमित्त भवानी पेठेतील हनुमान मंदिरात जेदिया हे रात्री ९ वाजता गेले होते. यावेळी त्यांची पत्नी व बहिणीही बरोबर होत्या. त्यावेळी हनुमान मंदिरात अचानक एक बाई आत गेली. त्यावेळी फिर्यादी हे त्यांच्या बहिणीला ‘ही बाई कोण आहे. हनुमान मंदिरात जाण्यास महिलांना मनाई आहे,’ असे बोलत होते. हे तेथे आलेल्या जित नावाच्या तरुणाने ऐकले. त्यावरून त्यांच्यात वादावादी झाली. त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. त्यांनंतर त्यांच्यात हाणामारी झाली. या तरुणाने फिर्यादी व त्यांची पत्नी यांना बांबुने मारहाण करून जबर जखमी केले. खडक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सावंत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Husband and wife beaten for saying women are not allowed to go to Hanuman temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.