अक्कलकोट देवदर्शनावरून पुण्याला येताना ३ वाहनांच्या विचित्र अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 06:17 PM2022-03-20T18:17:46+5:302022-03-20T18:18:11+5:30

अपघातास कारणीभुत ट्रक ड्रायव्हर फरार झाला असल्याची माहीती इंदापूर पोलिसांनी दिली

Husband and wife die in bizarre accident of 3 vehicles coming to Pune from Akkalkot Devdarshan | अक्कलकोट देवदर्शनावरून पुण्याला येताना ३ वाहनांच्या विचित्र अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

अक्कलकोट देवदर्शनावरून पुण्याला येताना ३ वाहनांच्या विचित्र अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

googlenewsNext

इंदापूर : अक्कलकोट येथे देवदर्शन करून चारचाकी वाहनाने पुण्याला येत असताना झालेल्या विचित्र अपघातात पती - पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.   सोलापूर-पूणे बाह्यवळण महामार्ग डोंगराई सर्कल येथे गतिरोधकावर वेग कमी केल्याने पाठीमागून वेगात आलेल्या मालवाहतुक ट्रकने चारचाकी वाहनाला जोराची धडक दिली. या अपघातात पती-पत्नीचा मृत्यु झाल्याची घटना शनिवारी रात्री ९.सुमारास घडली.

या अपघातात संंजीव दत्तात्रय कुलकर्णी (वय५८) यांचा जागीच मृत्यु झाला. तर त्यांची पत्नी सुखदा संजीव कुलकर्णी यांना गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी पूणे येथील ससुन रूग्णालयामध्ये घेऊन जाताना त्यांचा मृत्यु झाला. याबाबत संजिव कुलकर्णी यांचा मुलगा श्रेयान संजिव कुलकर्णी (वय २९), रा.पिंपळे सौदागर,ता.हवेली, जि.पूणे याने या अपघाताची खबर इंदापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.

संजीव,पत्नी सुखदा व मुलगी अनघा हे तीघेजण कारमधून अक्कलकोटला देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करून पुण्याला येताना रात्री ९ च्या सुमारास इंदापूर हद्दीत गतीरोधक पाहून गाडीचा वेग कमी केला. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रकने कारला जोराची धडक दिली. तेव्हा संजीव यांची गाडी समोर उभी  असलेल्या टेम्पोला धडकल्याने भीषण अपघात घडला. अपघातास कारणीभूत टेम्पो व ट्रकला पोलिसांनी ताब्यात घेतले. अपघातास कारणीभुत ट्रक ड्रायव्हर फरार झाला असल्याची माहीती इंदापूर पोलिसांनी दिली.

Web Title: Husband and wife die in bizarre accident of 3 vehicles coming to Pune from Akkalkot Devdarshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.