दुर्दैवी! बारामती-पाटस रस्त्यावर भीषण अपघात; पती-पत्नी जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 02:20 PM2021-11-18T14:20:23+5:302021-11-18T14:26:54+5:30

ग्रामस्थांनी पोलिसांनी कळविल्यानंतर काही वेळातच तालुका पोलिस घटनास्थळावर दाखल झाले. पोलिसांनी क्रेनच्या साह्याने मृतदेह बाहेर काढण्यात आले... (undawadi kadepathar)

husband and wife killed on the spot baramati patas road | दुर्दैवी! बारामती-पाटस रस्त्यावर भीषण अपघात; पती-पत्नी जागीच ठार

दुर्दैवी! बारामती-पाटस रस्त्यावर भीषण अपघात; पती-पत्नी जागीच ठार

googlenewsNext

उंडवडी कडेपठार (बारामती):बारामती - पाटस रस्त्यावर सोनवडी सुपे फाट्यावर भरधाव ट्रकने दुचाकीवरील दोघांना चिरडले. या आपघातात दुचाकीवरील पती - पत्नी जागीच ठार झाल्याची घटना ( ता.१८ ) गुरुवारी सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान घडली. या आपघातात काळूराम गणपत लोंढे ( वय ६०) शाकूबाई काळूराम लोंढे (वय ५५ ) रा. देऊळगाव रसाळ ता. बारामती दुर्दैवी मरण पावलेल्या पती-पत्नीचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, गुरुवारी सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान माल ट्रक (क्रमांक  एम. एच. १८ बी.जी. ०८१४ ) हा पाटसकडून बारामतीकडे भरधाव वेगाने निघाला होता. याचवेळी सोनवडी सुपे फाट्यावर  दुचाकी गाडी क्रमांक ( एम. एच ४२ बी. सी. ८२३४ ) बारामतीच्या दिशेने निघाली होती. यावेळी माल ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले. अपघातानंतर ट्रकचा चालक व क्लिनर पळून गेले. या आपघातात मालाने भरलेल्या ट्रकखाली दुचाकी आणि पती- पत्नी दोघेही अडकल्याने स्थानिक ग्रामस्थ व पोलिस मित्रानी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रकमध्ये माल असल्याने आणि ट्रक चारीत अडकल्याने जाग्यावरुन हलू शकला नाही. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या प्रयत्नांना अपयश आले.

ग्रामस्थांनी पोलिसांनी कळविल्यानंतर काही वेळातच तालुका पोलिस घटनास्थळावर दाखल झाले. पोलिसांनी क्रेनच्या साह्याने मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघातानंतर परिसरातील लोकांनी घटनास्थळावर गर्दी केली होती. पुढील तपास बारामती तालुका पोलीसचे सहाय्यक फौजदार योगेश लंगुटे करत आहेत. 

Web Title: husband and wife killed on the spot baramati patas road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.