चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात हजर; पुण्यातील धक्कादायक प्रकार

By नितीश गोवंडे | Published: August 24, 2023 05:39 PM2023-08-24T17:39:50+5:302023-08-24T17:40:37+5:30

ठाण्यात आल्यावर माझ्या पत्नीला रागाच्या भरात चाकूने मारले असून तिला दवाखान्यात घेऊन चला अशी विनवणीही केली

Husband appears in police station after killing his wife due to suspicion of character; Shocking types in Pune | चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात हजर; पुण्यातील धक्कादायक प्रकार

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात हजर; पुण्यातील धक्कादायक प्रकार

googlenewsNext

पुणे: चारित्र्याच्या संशयावरून कौटुंबिक वादातून महिलेच्या गळ्यावर पतीने चाकूने वार केल्याची घटना खराडी भागात घडली. पत्नीचा खून करुन पती चंदननगर पोलिस ठाण्यात हजर झाला. लक्ष्मी केशव सीताफळे (४०, रा. लेबर कॅम्प, पाटीलबुवानगर, खराडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी महिलेचा पती केशव भीमराव सीताफळे (४५) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध चंदननगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित सीताफळे दांपत्य हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असून कामाच्या निमित्ताने मागील आठ ते दहा वर्षापासून पुण्यात वास्तव्यास आले होते. मयत लक्ष्मी या धुण्या-भांड्याचे काम करत होत्या तर त्यांचा पती केशव सीताफळे हा सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. त्यांना १२ वर्षाचा मुलगा देखील आहे. लक्ष्मी आणि पती केशव यांच्यात कौटुंबिक कारणावरुन वाद झाले होते. केशवने पत्नीला शिवीगाळ करत बुधवारी रात्री घरातच मुलासमोर पत्नीचा गळा चाकूने चिरला. पत्नीचा खून करुन तो थेट पोलीस ठाण्यात हजर झाला. खूनामागचे निश्चित कारण समजले नसून, प्राथमिक चौकशीत कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी सांगितले की, आरोपी केशव सीताफळे याने पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून घरातील सुरीने गळ्यावर वार केला, त्यानंतर तो थेट पोलिस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर त्याने आम्हाला, माझ्या पत्नीला रागाच्या भरात चाकूने मारले असून तिला दवाखान्यात घेऊन चला अशी विनवणी केली. आम्ही तात्काळ घटनास्थळी धाव घेत महिलेला ससून रूग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तीला तपासून मृत घोषित केले.

Web Title: Husband appears in police station after killing his wife due to suspicion of character; Shocking types in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.