चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:09 AM2021-03-22T04:09:43+5:302021-03-22T04:09:43+5:30
पुणे: दोन झालेल्या मुली आणि चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी ...
पुणे: दोन झालेल्या मुली आणि चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
योगेंद्र साही (वय २४, मूळ रा. नेपाळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पत्नी पूजाने आत्महत्या केली आहे. याबाबत २८ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. मागील तीन वर्षांपासून ते १८ मार्च २०२१ या कालावधीत ही घटना घडली.
पूजा ही पती योगेंद्रबरोबर राहात होती. यावेळी दोन्ही मुली असल्याच्या कारणावरून आणि चारित्र्याच्या संशयावरून तो तिला शिवीगाळ आणि मारहाण करीत होता. या त्रासाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी योगेंद्र याला न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी केली.