बारामती: न सांगता घराबाहेर गेल्याने पतीचा पत्नीवर कोयत्याने हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 01:31 PM2022-08-15T13:31:20+5:302022-08-15T13:32:05+5:30

बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

Husband attacked his wife with a knife for leaving the house without telling her Baramati | बारामती: न सांगता घराबाहेर गेल्याने पतीचा पत्नीवर कोयत्याने हल्ला

बारामती: न सांगता घराबाहेर गेल्याने पतीचा पत्नीवर कोयत्याने हल्ला

googlenewsNext

बारामती : न सांगता घराबाहेर गेलेल्या पत्नीवर पतीने कोयत्याने हल्ला केला. ही घटना दि. १० रोजी सांयकाळी घडली. यात संबंधित महिला जखमी झाली असून, बारामतीत खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याबाबत बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.

दीपाली सुदर्शन जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुदर्शन रणजित जाधव (सध्या रा. बयाजीनगर, रुई, बारामती, मूळ रा. किणी, ता. आष्टी, जि. बीड) याच्याविरोधात पोलिसांनी गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. हे पती-पत्नी सध्या बारामतीत राहून काम करत उपजीविका करतात. २०११ मध्ये त्यांचा प्रेमविवाह झालेला आहे. तेव्हापासून ते बारामतीतच राहतात. दि. १० रोजी फिर्यादी तिच्याकडील दुचाकीवरून पेन्सिल चौकात गेली होती. त्यावेळी तिचे पती कामाला गेले होते.

सायंकाळी ते घरी आले असताना, पत्नी घरात दिसली नाही. त्यांनी तिला फोन करत चौकशी केली असता, तिने कामानिमित्त बाहेर आल्याचे सांगितले. रात्री पावणेआठच्यासुमारास ती घरी गेली असता, पतीने मला न सांगता तू घराबाहेर का गेलीस, असे म्हणत तिला मारहाण केली. मॉलमध्ये सेल लागला असून, तेथे मी खरेदीला गेले होते, असे उत्तर फिर्यादीने दिले. त्यानंतर पतीने कोयता हातात घेत तिच्या डोक्यावर मारहाण करून जखमी केले. ती भीतीने घराबाहेर पळून गेली. तेथील लोकांनी तिला रुग्णालयात दाखल केले.

Web Title: Husband attacked his wife with a knife for leaving the house without telling her Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.