"तरुणांना व्हायचंय आता भाई", त्यांच्या दहशतीने सामान्य नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:11 PM2021-04-18T16:11:08+5:302021-04-18T16:24:16+5:30

भाई म्हणण्यास नकार देणार्‍या पती पत्नीला टोळक्याची मारहाण, आठ जणांवर गुन्हा दाखल

Husband beats wife for refusing to say 'brother', charges filed against eight | "तरुणांना व्हायचंय आता भाई", त्यांच्या दहशतीने सामान्य नागरिक त्रस्त

"तरुणांना व्हायचंय आता भाई", त्यांच्या दहशतीने सामान्य नागरिक त्रस्त

googlenewsNext
ठळक मुद्देहडपसर भागात टोळक्यांची दहशत हे पोलिसांसमोरील आव्हान

पुणे: ‘सोन्या म्हणायचे नाही, मी इथला भाई आहे, भाई म्हणून बोलायचे’ असे सांगूनही भाई म्हणण्यास नकार दिल्याने टोळक्याने पती पत्नीला मारहाण केली. ही घटना साडेसतरा नळी येथे १५ एप्रिलला रात्री १० वाजता घडली.

 हडपसरपोलिसांनी सोन्या जगताप, जालिंदर खलसे, शुभम साखुरे, करण दहीवडे, शाहरुख, उंदर्‍या, सोन्या जगतापचे मित्र यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला  आहे.  याप्रकरणी आनंदा मारुती काळे (वय २५, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.

काळे हे आपल्या मोटारसायकलवरुन जात असताना त्यांच्या बुलेटचा आवाज वाढवल्याने सोन्या जगताप याने त्यांना ‘ए आवाज कोणाला काढला रे’ असे विचारले. तेव्हा काळे यांनी ‘ए सोन्या तुला नाही केला’ असे म्हणाले. त्यावर टोळक्यांमधील एकाने ‘त्याला सोन्या म्हणायचे नाही भाई म्हणायचे,’ असे सांगितले. ‘मी त्याला सोन्याच बोलणार, भाई तुझ्या घरी’ असे उत्तर काळेंनी दिले. त्यावर राग येऊन सोन्या जगताप व इतरांनी आनंदा काळे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन बेल्टने मारले. त्याच्या सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या त्यांची पत्नी व मावस सासु यांनाही मारहाण केली.

Web Title: Husband beats wife for refusing to say 'brother', charges filed against eight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.