विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:09 AM2021-07-08T04:09:17+5:302021-07-08T04:09:17+5:30
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मोनिका अनिकांत बांगर (वय ३२, रा. थोरांदळे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादमधील माहितीनुसार, ...
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मोनिका अनिकांत बांगर (वय ३२, रा. थोरांदळे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादमधील माहितीनुसार, विवाहिता मोनिका हिचा विवाह २०१९ रोजी पिंपळगाव खडकी येथील अनिकांत विठ्ठल बांगर यांच्याशी झाला होता. लग्न झाल्यानंतर पती बांगर यांनी फिर्यादीस वारंवार उपाशी ठेवून, तुझे बाहेर संबंध आहेत असा संशय घेऊन फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी वारंवार मारहाण केली. वेळोवेळी उपाशी ठेवण्यात आले. तसेच ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी माहेराहून पाच लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ केला आहे. याबाबत मोनिका बांगर यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून तिचा पती अनिकांत विठ्ठल बांगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अजित मडके करत आहे.
दुसऱ्या घटनेत वडगाव पीर (ता. आंबेगाव) येथे आपल्या माहेरी असलेली विवाहित महिला प्रतीक्षा शशांक गीते हिने दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा विवाह २०१७ साली शशांक शिवाजी गीते (रा. मलठण) याच्याशी झाला होता. लग्न झाल्यानंतर फिर्यादी महिला व तिचा पती नारायणगाव येथे राहत असताना तिच्या पतीने तिला वारंवार उपाशी ठेवून दुसऱ्या मुलीशी संबंध ठेवले होते. तसेच तो तिला नवीन व्यवसायासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये असे म्हणत तिला वारंवार शिवीगाळ व दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होता. पैसे न आणल्याने फिर्यादीला घरातून बाहेर काढले होते. सासू पद्मिनी शिवाजी गीते, दीर सोमेश शिवाजी गीते (सर्व रा. मलठण, गीतेवस्ती) यांनी तुला नीट राहता आले तर राहा नाहीतर निघून जा, अशी धमकी दिली होती. या वारंवारच्या त्रासाला कंटाळून प्रतीक्षा गीते हिने मंचर पोलीस ठाण्यात वरील तिघांविरोधात फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अर्पणा जाधव करत आहे.