पत्नीच्या खोट्या तक्रारी, नातेवाईकांमध्ये बदनामी अशा त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 08:16 PM2021-10-31T20:16:13+5:302021-10-31T20:16:24+5:30
स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला
पुणे : पत्नीच्या खोट्या तक्रारी व नातेवाईकांमध्ये, कंपनीमध्ये केलेल्या बदनामीमुळे पतीने वीष पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रकाश संभाजी चौघुले (वय ३३) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी गीरीष संभाजी चौघुले (वय ३०, रा. वारजे) यांनी वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी स्नेहल प्रकाश चौघुले (वय २८, रा. वारजे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २९ सप्टेबर रोजी घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश यांची पत्नी स्नेहल हिने त्यांच्याविषयी खोट्या तक्रारी करुन नातेवाई व कंपनीमध्ये त्यांची बदनामी केली. तसेच त्यांना अपमानीत करुन जीवन जगणे असह्य केल्याने तिच्या त्रासाला कंटाळून प्रकाश चौघुले यांनी विषारी औषध पिले. त्यांना पिरंगुट येथील मुळशी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी आता फिर्याद दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करीत आहेत.