संतापजनक ! पत्नीनं पैसे दिले नाहीत म्हणून पतीनं 4 महिन्यांच्या बाळाला आपटलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 01:34 PM2018-05-02T13:34:09+5:302018-05-02T19:24:05+5:30

पतीने पत्नीकडे दोनशे रुपये मागितले. तिने दोनशे रुपये नाहीत असे सांगितले. त्यावरून त्यांच्यात भांडण झाले.

Husband crushed the four-monthbaby on the ground due to quarral with his wife | संतापजनक ! पत्नीनं पैसे दिले नाहीत म्हणून पतीनं 4 महिन्यांच्या बाळाला आपटलं

संतापजनक ! पत्नीनं पैसे दिले नाहीत म्हणून पतीनं 4 महिन्यांच्या बाळाला आपटलं

Next
ठळक मुद्देबाळाच्या डोक्याला दुखापत महिलेने बाळाचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

पिंपरी : किरकोळ कारणावरून पिंपरीतील बौद्धनगर येथे पती पत्नीचे भांडण झाले. ही घटना सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. भांडणाचा राग पतीने बाळावर काढला. बाळाला उचलून जमिनीवर आपटले. त्यात बाळ गंभीर जखमी झाले असून पुण्यातील ससून रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पत्नीने पतीविरोधात पिंपरी पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस अटक झाली आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभांगी दत्ता देशमुख (वय २८, रा. बौद्धनगर) असे फिर्याद दाखल करणा-या महिलेचे नाव आहे. दत्ता अनिल देशमुख (वय ३४)असे आरोपीचे नाव आहे. पती दत्ता देशमुख याने पत्नी शुभांगीकडे दोनशे रुपये मागितले.

तिने दोनशे रुपये नाहीत असे सांगितले. त्यावरून त्यांच्यात भांडण झाले. या भांडणाचा राग पतीने बाळावर काढला. कसलाही विचार न करता चार महिन्याच्या चिमुकल्याला उचलून जमिनीवर आपटले. बाळाच्या डोक्याला दुखापत झाली आहे. फिर्यादी महिलेने बाळाचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक रामदास मुंडे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

Web Title: Husband crushed the four-monthbaby on the ground due to quarral with his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.