Pune: पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या; उत्तमनगर पोलिस ठाणे हद्दीतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 10:09 AM2024-02-27T10:09:31+5:302024-02-27T10:10:13+5:30

ही धक्कादायक घटना खडकवासला धरणाशेजारील कुडजे गावातील जंगलात रविवारी (दि. २६) सायंकाळी घडली....

Husband ended ownself by killing wife; Type in Uttamnagar police station limits | Pune: पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या; उत्तमनगर पोलिस ठाणे हद्दीतील प्रकार

Pune: पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या; उत्तमनगर पोलिस ठाणे हद्दीतील प्रकार

पुणे/शिवणे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत आधी तिच्या डोक्यात दगड घालून खून केला आणि स्वतःही झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना खडकवासला धरणाशेजारील कुडजे गावातील जंगलात रविवारी (दि. २६) सायंकाळी घडली.

सोमनाथ सखाराम वाघ (५३, रा. वारजे माळवाडी) आणि पत्नी सुवर्णा सोमनाथ वाघ (४२) अशी मृतांची नावे आहेत. मृत सुवर्णा वाघ ही आरोपीची दुसरी पत्नी होती.

उत्तमनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे पती-पत्नी रविवारी सकाळी साडेनऊ वाजता दुचाकीवरून घरातून बाहेर पडले होते. उत्तमनगरमार्गे खडकवासला धरणाशेजारील कुडजे गावातील जंगलात गेले. रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी केली हाेती. तेथे त्यांच्यामध्ये काही वाद झाला, ज्यामुळे पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर पतीने स्वतःही ट्रॅक पँटने झाडाला गळफास लावून घेतला. सकाळी उशीर झाला तरी दोघे घरी परत आले नाही. त्यामुळे त्यांची मुलगी व पुतण्याने त्यांचा शोध सुरू केला असता सायंकाळी त्यांची दुचाकी पिकॉक बे परिसरात आढळून आली. त्या परिसरात शोध घेतला असता त्यांना आईचा मृतदेह आढळला, तर वडिलांनी झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी या घटनेची माहिती उत्तमनगर पोलिसांना कळवली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक युसूफ शेख तसेच सहायक निरीक्षक अमृता चौरे, पोलिस कर्मचारी प्रसाद जोशी, धनंजय बिटले घटनास्थळी दाखल झाले. कौटुंबिक भांडणातून हा गुन्हा घडला असल्याची माहिती देण्यात आली. याबाबत उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक युसूफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: Husband ended ownself by killing wife; Type in Uttamnagar police station limits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.