पतीनेचे पत्नीला मित्रांशी लैंगिक संबंध ठेवायला भाग पाडले, बारामतीतील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 07:31 PM2021-12-15T19:31:44+5:302021-12-15T19:51:56+5:30

सन २०१७ ते जुलै २०२१ या कालावधीत ही घटना घडली. त्यानुसार पोलिसांनी पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल केला आहे

husband forced his wife to have physical relation with friends baramati crime news | पतीनेचे पत्नीला मित्रांशी लैंगिक संबंध ठेवायला भाग पाडले, बारामतीतील धक्कादायक प्रकार

पतीनेचे पत्नीला मित्रांशी लैंगिक संबंध ठेवायला भाग पाडले, बारामतीतील धक्कादायक प्रकार

Next

बारामती: लैंगिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या पतीने पत्नीला मित्रांशी जबरदस्तीने शारिरिक संबंध ठेवायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी संबंधित पत्नीने तक्रार दिल्यानंतर शहर पोलिसांनी तिच्या पतीसह अन्य सहाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी संबंधित विवाहितेने फिर्याद दिली आहे. सन २०१७ ते जुलै २०२१ या कालावधीत ही घटना घडली. त्यानुसार पोलीसांनी पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तिच्या पतीविरोधात तिला जबरदस्तीने हे कृत्य करायला भाग पाडल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

शहरानजीक फलटण रस्त्यावर ही फियार्दी महिला राहते. तिचा पती लैंगिकदृष्ट्या दुर्बल आहे. तिने इतरांशी संबंध ठेवण्यासाठी पतीकडून दबाव टाकला जात असल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. पिडीतेच्या  मोबाईलवरून तो मित्रांना मेसेज करून घरी बोलावून घेत असे. पत्नीने विरोध केल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचे देखील फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.

दरम्यान, याप्रकरणी संबंधित महिलेने ९ डिसेंबर रोजी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पाच दिवस उलटुन देखील संवेदनशील गुन्हा असतानाही पोलिसांनी माध्यमांना याबाबत माहिती मिळाली नाही. अटक आरोपींना न्यायालयात नेल्यानंतर याची माहिती समजली. त्यामुळे विविध चर्चांना ऊत आला आहे.

Web Title: husband forced his wife to have physical relation with friends baramati crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.