पतीने किडनी देऊन पत्नीला दिले जीवनदान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 07:30 PM2018-07-13T19:30:33+5:302018-07-13T19:36:06+5:30

ससून रुग्णालयामध्ये किडनी प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर शुक्रवारी सातवे प्रत्यारोपण करण्यात आले.

husband given new life to wife by giving a kidney | पतीने किडनी देऊन पत्नीला दिले जीवनदान 

पतीने किडनी देऊन पत्नीला दिले जीवनदान 

Next
ठळक मुद्देदेणगीच्या माध्यमातून या रुग्णाचे किडनी प्रत्यारोपण यकृत प्रत्यारोपणासाठी ५ रुग्ण नोंदणी प्रक्रियेत अजून १५ रुग्ण ससूनच्या किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीवर

पुणे : पत्नीने किडनी देऊन पतीचे प्राण वाचविल्याचे अनेकदा ऐकायला मिळते. पण पतीने पत्नीला किडनी दान करून तिला जीवनदान देत समाजात आदर्श घालून दिला आहे. ससून रुग्णालयामध्ये शुक्रवारी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.
ससून रुग्णालयामध्ये किडनी प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर शुक्रवारी सातवे प्रत्यारोपण करण्यात आले. तर जिवंत दाता असलेले हे तिसरे प्रत्यारोपण ठरले. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, हडपसर भागातील महादेवनगर येथील रहिवासी असलेल्या ४८ वर्षीय व्यक्तीच्या ४२ वर्षीय पत्नी गृहिणी आहेत. त्यांना २०११ पासून किडनी विकार झाला होता. त्यासाठी खासगी रुग्णालयात उपचारही सुरू होते. काही कालावधीनंतर त्यांच्यावर ससून रुग्णालयात ससूनमध्ये डायलिसिस सुरु करण्यात आले. किडनीची स्थिती पाहता ससूनच्या तज्ञ डॉक्टरांनी त्यांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा सल्ला दिला होता. त्या व्यक्तीच्या पत्नीला किडनी देण्यासाठी लगेचच संमती दिली.
किडनी देणाऱ्या व्यक्तीचा हडपसर येथे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांना एक मुलगा असून तो वाणिज्य पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. त्यांच्याच खांद्यावर घराची संपुर्ण जबाबदारी आहे. तेच किडनी दाता असल्याने किडनी प्रत्यारोपणाचा खर्च त्यांना परवडणारा नव्हता. त्यामुळे देणगीच्या माध्यमातून या रुग्णाचे किडनी प्रत्यारोपण करण्याचे ठरले. त्यानुसार शुक्रवारी रुग्णालयामध्ये प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. या पथकामध्ये डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. भालचंद्र काश्यपी, अभय सदरे, डॉ. निरंजन आंबेकर, डॉ. धनेश कामेरकर, डॉ. राजेश श्रोत्री, डॉ. अभिजीत पाटील, डॉ. अमित बंगाळे, डॉ. सागर भालेराव, डॉ. शंकर मुंडे, डॉ. विद्या केळकर, डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. रोहित संचेती, डॉ. सुरज जाधवर यांचा समावेश होता. तसेच डॉ. हरीश टाटिया, एम. बी. शेळके, सय्यद सिस्टर, अवयव प्रत्यारोपन समन्व्यक अर्जुन राठोड यांनी सहकार्य मदत केले.  
.................
पतीने किडनी देऊन पत्नीला दिले जीवनदानकिडनी दाता हेच कुटूंबाचे आधार असल्याने त्यांची शस्त्रक्रिया देणगीच्या माध्यमातून करण्यात आली. अजून १५ रुग्ण ससूनच्या किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीवर आहेत. तर यकृत प्रत्यारोपणासाठी ५ रुग्ण नोंदणी प्रक्रियेत आहेत. दानशूर व्यक्ती व सेवाभावी संस्था यांनी देणगीच्या माध्यमातून पुढाकार घेतल्यास प्रत्यारोपनाचा खर्च न परवडणारी कुटुंबे प्रत्यारोपणाचा पर्याय स्वीकारतील.- 
डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता , ससून रुग्णालय 
-----

Web Title: husband given new life to wife by giving a kidney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.