चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खुन, पुण्यातील घटना, पतीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 09:17 PM2018-04-15T21:17:27+5:302018-04-15T21:17:27+5:30
देवराम हा रंगकाम करतो़ कोमल या वडारवाडीत धुणेभांड्यांची कामे करीत असत़. गेल्या काही दिवसांपासून तो पत्नी कोमल हिच्या चारित्र्याचा संशय घेत होता़. देवरामने कोमल हिला रविवारी दुपारी घरापासून जवळ असलेल्या हनुमान टेकडीवरील पॅगोडाच्या जवळ घेऊन गेला़ तेथे त्याने तीक्ष्ण हत्याराने तिच्या गळ्यावर, पाठीवर सपासप वार केले़
पुणे : चारित्र्याच्या संशयावरुन तीक्ष्ण हत्याराने वार करुन पत्नीचा खुन करण्याची घटना हनुमान टेकडी परिसरात रविवारी दुपारी उघडकीस आली़. कोमल देवराम देवकर (वय ३२, रा़ जुनी वडारवाडी) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे़ याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी पती देवराम शेट्टी देवकर याला अटक केली आहे़
याबाबत पोलिसांनी सांगितले की, देवराम हा रंगकाम करतो़ कोमल या वडारवाडीत धुणेभांड्यांची कामे करीत असत़. गेल्या काही दिवसांपासून तो पत्नी कोमल हिच्या चारित्र्याचा संशय घेत होता़ या कारणावरुन त्यांच्यात वाद होत असत़ देवरामने कोमल हिला रविवारी दुपारी घरापासून जवळ असलेल्या हनुमान टेकडीवरील पॅगोडाच्या जवळ घेऊन गेला़ तेथे त्याने तीक्ष्ण हत्याराने तिच्या गळ्यावर, पाठीवर सपासप वार केले़ यावेळी हा प्रकार हनुमान टेकडीवर असलेल्या काही नागारिकांनी पाहिला़. त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली़ घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कदम, पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोलंबीकर यांनी घटनास्थळी धाव घेतली़ देवकर याला पोलिसांनी अटक केली आहे़. चारित्र्याच्या संशयावरुन त्याने पतीचा खुन केल्याची माहिती तिच्या मामाने पोलिसांना दिली़.