दारूच्या नशेत पतीने कुऱ्हाडीने वार करुन केली पत्नीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 10:09 AM2019-04-01T10:09:16+5:302019-04-01T10:31:59+5:30

चारित्र्याच्या संशयावरुन दारूच्या नशेत पतीने कुऱ्हाडीने वार करुन पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  महंमदवाडतील वाडकर मळा येथे मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

husband murders wife in pune | दारूच्या नशेत पतीने कुऱ्हाडीने वार करुन केली पत्नीची हत्या

दारूच्या नशेत पतीने कुऱ्हाडीने वार करुन केली पत्नीची हत्या

ठळक मुद्देचारित्र्याच्या संशयावरुन दारूच्या नशेत पतीने कुऱ्हाडीने वार करुन पत्नीची हत्या केली आहे.महंमदवाडतील वाडकर मळा येथे मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संगीता श्रीकांत चव्हाण असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.

पुणे - चारित्र्याच्या संशयावरुन दारूच्या नशेत पतीने कुऱ्हाडीने वार करुन पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  महंमदवाडतील वाडकर मळा येथे मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

संगीता श्रीकांत चव्हाण (वय २६, रा़ वाडकर मळा, महंमदवाडी) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर श्रीकांत कमाल चव्हाण हा पळून गेला आहे. त्याच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता आणि श्रीकांत हे वाडकर मळा येथे लेबर कँपमध्ये झोपडे टाकून राहत होते. श्रीकांत हा संगीताच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत असे. दोघेही मजुरीचे काम करत होते. ते मुळचे कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात राहणारे आहे. रविवारी रात्री श्रीकांत दारू पिऊन आला. त्यावेळी त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा  श्रीकांतने संगीतावर कुऱ्हाडीने वार करुन तिची हत्या केली व तो पळून गेला. या घटनेची माहिती वानवडी पोलिसांनी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यानंतर वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल भोसले व त्यांचे सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे. वानवडी पोलीस श्रीकांत चव्हाण यांचा शोध घेत आहेत.

Web Title: husband murders wife in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.