दुचाकीवर नवरदेव एकटाच पोहचला बारामतीत; विवाहाच्या रेशीमगाठी गुंफल्या पाच जणांच्या उपस्थितीत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 07:13 PM2020-04-29T19:13:06+5:302020-04-29T19:14:04+5:30

लॉकडाऊन मध्ये अनेकांनी हे विवाह पुढे ढकलले आहेत,तर काहींना लॉकडाऊन संपण्याची प्रतीक्षा आहे.

husband reached Baramati alone on a two-wheeler and completed marriage | दुचाकीवर नवरदेव एकटाच पोहचला बारामतीत; विवाहाच्या रेशीमगाठी गुंफल्या पाच जणांच्या उपस्थितीत

दुचाकीवर नवरदेव एकटाच पोहचला बारामतीत; विवाहाच्या रेशीमगाठी गुंफल्या पाच जणांच्या उपस्थितीत

Next
ठळक मुद्देबारामती शहरात लॉकडाऊनमध्ये मोजक्याच लोकांमध्ये उरकलेला विवाह कौतुकाचा विषय

बारामती : कोरोना संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरु आहे. यामध्ये अनेकांचे विवाह अडकले आहेत. विवाह मानवी जीवनातील अत्यंत महत्वाचा टप्पा समजला जातो. मात्र, लॉकडाऊन मध्ये अनेकांनी हे विवाह पुढे ढकलले आहेत,तरकाहींना लॉकडाऊन संपण्याची प्रतिक्षा आहे. बारामती शहरात लॉकडाऊनमध्ये मोजक्याच लोकांमध्ये उरकलेला विवाह कौतुकाचा विषय ठरला आहे.या विवाहासाठीनवरदेव एकटाच दुचाकीवरुन बारामतीत एकटाच पोहचला,तर विवाहानंतर नवदांपत्यदुचाकीवरच फलटणकडे नवरदेवाच्या घरी रवाना झाले.

शहरातील महात्मा फुले नगर येथील साहेबराव माणिक जगताप यांनी त्यांचीमुलगी कांचन हिचे फलटण येथील सुरज दिलीप काकडे यांच्याशी ठरलेहोते.पूर्व नियोजित ठरलेल्या लग्न सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी मंगळवारी(दि २८)  संध्याकाळी ६.३० यावेळेत फलटण येथील नवरदेव सुरज दुचाकीवर पोहचले.त्यासाठी नवरदेव काकडे यांनी पोलिसांची परवानगी देखील घेतली होती. तसेच बारामतीत हे लग्न मोजक्या दहा लोकांनमध्ये लावण्यासाठी वधुच्या कुटुंबियांनी उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांची परवानगी देखील घेतली होती.  

शासनाच्या फिजिकल डिस्टन्स नियमांचे पालन करण्यासह मोजक्याच लोकांच्या उपस्थिती विवाह उरकणार असल्याबाबत अर्ज करण्यात आला होता. या पूर्वनियोजित लग्न सोहळ्याला नवरदेव सुरज यांचे आई व वडील लॉकडाऊन मध्ये मुंबईला अडकले आहेत.तसेच फलटण पोलिसानी केवळ नवरदेवाला परवानगी दिली होती. आमराई मधील महात्मा फुले नगर येथील महात्मा फुले व्यायाम शाळेत मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न सोहळा साध्या पद्धतीने पार पडला. अवघ्या चार ते पाच जणांमध्ये पार पडलेला विवाह शहरात चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. यावेळी सोशल डिस्टन्स चे सर्वनियम पाळुन विवाह उरकण्यात आला.त्यानंतर नवदांपत्य दुचाकीवर नवरेदवाच्याघरी निघुन गेले.
यावेळी नगरसेविका अनिता जगताप, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील,सहायक पोलीस निरीक्षक पद्मरात गंपले,सामाजिक कार्यकर्ते दिनेश जगताप आदी उपस्थित होते.ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी लॉकडाऊनमध्ये हा विवाह पारपाडण्यासाठी वधुच्या कुटुंबियांना मार्गदर्शन केले.
—————————————

Web Title: husband reached Baramati alone on a two-wheeler and completed marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.