पत्नीच्या उपचारांसाठी पैसे उपलब्ध न झाल्याने नैराश्यातून पतीने घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 04:56 PM2021-10-25T16:56:41+5:302021-10-25T17:39:48+5:30

पत्नीच्या औषधोपचारासाठी पैसे उपलब्ध न झाल्याने नैराश्य येऊन पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यात घडल्याची समोर आली आहे

Husband suffers from depression due to lack of funds for his wife's treatment | पत्नीच्या उपचारांसाठी पैसे उपलब्ध न झाल्याने नैराश्यातून पतीने घेतला गळफास

पत्नीच्या उपचारांसाठी पैसे उपलब्ध न झाल्याने नैराश्यातून पतीने घेतला गळफास

googlenewsNext
ठळक मुद्देवडगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

बारामती (सांगवी - सुपे) : पत्नीच्या औषधोपचारासाठी पैसे उपलब्ध न झाल्याने नैराश्य येऊन पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यात घडल्याची समोर आली आहे. कुतवळवाडी (ता.बारामती) येथे शनिवारी (दि. २३) रोजी पहाटे ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मनोहर संभाजी कुतवळ (वय ३५, रा.कुतवळवाडी) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद दाखल केली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली.

मनोहर यांच्या पत्नीला कॅन्सर होता. त्यामुळे ती गेली दोन महिन्यांपासून पुण्यातील रुग्णालयात उपचार घेत होती. पुण्यातील जहांगीर रुग्णालयामध्ये पत्नीवर औषधोपचार सुरु होते. या शेतकऱ्याला रुग्णालयाकडून पैसे भरण्यास सांगितले जात होते. त्यामुळे मनोहर यांनी जवळपास साडेचार लाख रुपये जमा करून रुग्णालयात भरले होते. तर इतर पैशांची जुळवाजुळव होत नव्हती. त्याचा तणाव मनोहर यांच्यावर होत होता. त्यांना रुग्णालयातून अजून रक्कम भरण्याचा निरोप आल्यानंतर शनिवारी पहाटे झाडाला गळफास घेत मनोहरने आत्महत्या केली.

 मनोहर यांचे चुलते दत्तात्रय कुतवळ हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांच्या संपर्कात होते. संबंधित रुग्णालयाला बिल कमी करण्याबाबतची प्रक्रीया सुरु असतानाच मनोहर यांनी टोकाचा निर्णय घेत आत्महत्येचे पाऊल उचलले. त्यानंतर मुसळे यांनी ही परिस्थिती सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तातडीने संबंधित रुग्णालय गाठले आणि तातडीने संबंधित महिलेच्या उपचाराचे संपूर्ण बिल माफ करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच रुग्णालयात दिलेली रक्कम परत करण्याच्या सुचना दिल्या असल्याची माहिती दत्तात्रय कुतवळ यांनी दिली.

दवाखान्याच्या बिलांसंदर्भात कोणीही टोकाचा निर्णय घेऊ नये. काहीही अडचण असल्यास धर्मादाय आयुक्तांसोबत चर्चा करावी. पुणे, सातारा, सोलापूर, नगर या चार जिल्ह्यांतील १५० पेक्षा जास्त दवाखाने धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारीत आहेत. त्यांमध्ये काहीतरी मार्ग काढता येतो. पण, आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय कोणीही घेऊ नये असे पुणे येथील सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. या महिलेचे एकुण ४ लाख ४५ हजार रक्कम धर्मादाय आयुक्त फंडातुन दिली जाईल. तसेच यापुढे या महिलेवर होणाऱ्या उपचाराचा खर्च धर्मादाय कार्यालयातून दिला जाणार असल्याचे बुक्के यांनी सांगितले. 

Web Title: Husband suffers from depression due to lack of funds for his wife's treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.