चॅनल बदण्याच्या भांडणात पतीने घेतला पत्नीचा चावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 05:47 PM2019-11-08T17:47:29+5:302019-11-08T17:49:34+5:30

चॅनल बदण्यावरुन झालेल्या भांडणात पतीने पत्नीचा चावा घेऊन जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Husband takes wife's bait on argument on changing Channel | चॅनल बदण्याच्या भांडणात पतीने घेतला पत्नीचा चावा

चॅनल बदण्याच्या भांडणात पतीने घेतला पत्नीचा चावा

Next

पुणे : नवरा बायको घरात चित्रपट पाहत असताना अचानक नव-याला दुसरा चँनेल बदलण्याची हुक्की आली. यामुळे नाराज झालेल्या बायकोने त्याच्यावर तोंडसुख घेण्यास सुरुवाता केली. यावर दोघांमध्ये झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर पुढे भांडणात झाले. हे भांडण इतक्या टोकाला गेले की, नव-याला अनावर झालेल्या रागात त्याने बायकोला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नव्हे तर त्याने बायकोचा गळा दाबून तिच्या हाताला चावून तिला जखमी केले. कात्रज रस्त्यावरील शिवशंभो नगर येथे ही घटना घडली. 

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार विठ्ठल ज्ञानदेव गरड (वय 30, रा.शिवशंभो नगर) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत त्याची पत्नी विजयश्री विठ्ठल गरड (वय 30) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे घरात टिव्हीवर चित्रपट पाहत होते. त्यावेळी आरोपीला अचानक ज्या चँनेलवर चित्रपट लागला आहे तो बदलुन दुसरा चँनेल पाहण्याची हुक्की आली. यासाठी त्यांनी बायकोकडे रिमोटची मागणी केली. यावर तिने  ‘चांगला चित्रपट लागला आहे. तो पाहु द्या.’ अशी विनंती आरोपीला केली. मात्र या उत्तराचा राग आल्याने आरोपीने आपल्या पत्नीस शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला दोघांमध्ये सुरु असणा-या वादविवादाचे रुपांतर पुढे भांडणात झाले. पत्नीने रिमोट देण्यास विरोध केल्याने पतीचा राग अनावर झाला. यावर त्याने तो रिमोट काही तुझ्या बापाने दिलेला नाही.’ अशा शब्दांत पत्नीला उत्तर दिले.  यावर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण सुरु  झाले. 

पतीचा दुसरा चँनल पाहण्याचा आग्रह यावर बायकोचा चँनल बदलण्यास विरोध यावरुन नवरा बायकोच्या भांडणाचे पर्यावसान शेवटी मारहाणीत झाले. राग अनावर झालेल्या पतीने पत्नीला रिमोट न दिल्याच्या कारणावरुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नव्हे तर पत्नीचा गळा दाबुन तिच्या हाताला चावा घेत जखमी केले आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी पतीस अटक केली असून याप्रकरणाचा पुढील तपास  सहायक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी हे करीत आहेत. 

Web Title: Husband takes wife's bait on argument on changing Channel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.