पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीची आत्महत्या  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 02:04 AM2017-09-16T02:04:20+5:302017-09-16T02:04:31+5:30

पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून महात्मा फुलेनगर येथील तीस वर्षीय तरूणाने आत्महत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली.

Husband's suicide in his wife's immoral relationship | पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीची आत्महत्या  

पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीची आत्महत्या  

Next

चाकण : पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून महात्मा फुलेनगर येथील तीस वर्षीय तरूणाने आत्महत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली.
संजय रेशीम जाधव ( वय.३० वर्षे,रा.महात्मा फुले नगर,चाकण) याने (दि.१५) आपल्या राहत्या पत्राच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी पत्नी उषा संजय जाधव (चाकण), तिचा प्रियकर बाळू शिवा समुद्रे (रा. चेंबूर, मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजयचे वडील रेशीम मोतीराम जाधव यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय जाधव हा पत्नी व तीन लहान मुलांसह चाकण येथील महात्मा फुलेनगर येथे राहत असून, संजय हा (दि.१३) रोजी रात्री कामावरून घरी आला. तेव्हा घरामध्ये दोन अनोळखी इसम होते. त्यांच्या बाबत विचारले असता, तिने आपले चुलत भाऊ असल्याचे सांगितले. परंतू संजय याने अधिक चौकशी केली असता बाळु समुद्रे याच्या बरोबर पत्नी उषा हिचे प्रेमसंबध आहेत.असे समजले. उषा व बाळू समुद्रे यांच्यात अनैतिक संबंध असून हे संबध कायम ठेवण्यासाठी संजय यास शिवीगाळ व दमदाटी करण्यात आल्याची तक्रार चाकण पोलिस ठाण्यात दिली. तक्राराची दखल घेत नसल्याने संजय जाधव हा पोलीस ठाण्यातून आत्महत्या करण्यासाठी पळत सुटला, त्याला मुलांनी पकडून आणले.परंतू उषा जाधव ही बाळू समुद्रेसह आपल्या आई, बहीणीसोबत आपली लहान तीन मुले सोडून माहेरी गेली. संजय जाधव याने मात्र आत्महत्या केली.
चाकण येथील महात्मा फुलेनगर मधील शेकडो महिला व पुरूषांनी पोलिसांनी आरोपींना अटक न करता सोडून दिल्यानेच संजय याने आत्महत्या केली असल्याचा आरोप करत पोलिस ठाण्यात मोचार्ने दाखल होऊन,ठिय्या मांडल्याने काही काळ पोलीस ठाण्यातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. परंतू चाकण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रदिप पवार यांनी उपस्थित सर्वांना संबंधित आरोपींवर योग्य कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.

Web Title: Husband's suicide in his wife's immoral relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.