पत्नी व प्रियकराने काढला पतीचा काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:14 AM2021-08-18T04:14:23+5:302021-08-18T04:14:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क राजगुरुनगर: अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीच्या मदतीने प्रियकराने काटा काढल्याची घटना औंढे, (ता. खेड) ...

Husband's thorn removed by wife and lover | पत्नी व प्रियकराने काढला पतीचा काटा

पत्नी व प्रियकराने काढला पतीचा काटा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

राजगुरुनगर: अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीच्या मदतीने प्रियकराने काटा काढल्याची घटना औंढे, (ता. खेड) येथे उघडकीस आली आहे. खुनाचा हा गुन्हा तब्बल दीड महिन्यानंतर उघडकीस आणण्यात खेड पोलिसांना यश आले आहे. सोमनाथ बबन सुतार असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामा उर्फ रामदास नथू शिंदे, सोनल सोमनाथ सुतार, अक्षय सुरेश शिंदे, समीर कोंडाजी मेदगे (रा. औंढे, ता. खेड, सध्या रा. नैसिल नाका, महेंद्र नगर, घनसोली, नवी मुंबई), सुनील कोळी (पूर्ण नाव माहीत नाही, रा. बाबा गल्ली, तुर्भे स्टोअर) यांच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

औंढे येथील तरुणाचा मृतदेह २६ जून रोजी चासकमान धरणालगत असलेल्या वाळद गावच्या पुलानजीक पाण्यात आढळून आला होता. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. खून झालेला तरुण हा स्वतः च्या मालकी वाहनातून प्रवासी वाहतूक करण्याचा व्यवसाय करत होता. त्याचा अनैतिक संबंधातून खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. गावातील एक दुकानदार आणि अवैध दारू धंदा विक्रेता असणाऱ्या व्यक्तीचे सोमनाथ सुतार याच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याची चर्चा होती. खुनाच्या घटनेनंतर दीड महिना उलटूनही याबाबत पोलिसांना धागेदोरे मिळत नव्हते. धागेदोरे मिळवत अखेर पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले. सुतार यांची पत्नी सोनल सुतार व प्रियकर रामदास शिंदे यांच्या साथीदारांनी सोमनाथला (वय ३४, रा. औंढे, ता. खेड) दारू पाजली. यानंतर दोरीने गळा आवळून त्याचा खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने सुतार यांचा मृतदेह वाळद येथील चासकमान धरणाचे बॅकवॉटरवर असलेल्या पुलावरून पाण्यात टाकून दिला. आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे. सोनल सुतार हिला पोलिसांनी अटक केली असून ४ आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलीस जमादार भगवान गिजरे यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड करीत आहे.

Web Title: Husband's thorn removed by wife and lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.