हुश्श! संपली एकदाची परीक्षा
By admin | Published: March 20, 2017 04:22 AM2017-03-20T04:22:21+5:302017-03-20T04:22:21+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जात असलेल्या बारावीच्या मुख्य विषयांची परीक्षा संपल्याने
पिंपरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जात असलेल्या बारावीच्या मुख्य विषयांची परीक्षा संपल्याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. परंतु, काही विद्यार्थी मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसीसह इतर अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या तयारीला लागले आहेत.
राज्य मंडळातर्फे २८ फेब्रुवारी ते २५ मार्च या कालावधीत बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे. २८ फेब्रुवारी २०१७ पासून बारावीची परीक्षा सुरळीतपणे सुरू झाली असून कला, विज्ञान व वाणिज्य या शाखांच्या विद्यार्थ्यांच्या मुख्य विषयांचे पेपर संपले आहेत. बारावीचे वर्ष असल्याने काही पालकांकडून विद्यार्थ्यांवर दबाव टाकला जातो. तसेच कमी गुण मिळाले तर पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणार नाही, या तणावाखाली विद्यार्थी असतात. (प्रतिनिधी)