Video - भयंकर! हडपसरमध्ये घरांना भीषण आग; 16 जणांचे संसार जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 12:04 IST2022-07-17T11:59:12+5:302022-07-17T12:04:28+5:30
Hadapsar Fire : पहाटे पाचच्या सुमारास आग आटोक्यात आणली. आग लागल्यानंतर वेळीच मदत मिळाल्याने तीन लहान मुले आणि त्यांची आई वाचली.

Video - भयंकर! हडपसरमध्ये घरांना भीषण आग; 16 जणांचे संसार जळून खाक
पुणे - हडपसर येथील सं.न.८६ बिराजदारनगरमध्ये रविवारी पहाटे दोनच्या सुमारास पत्र्याच्या शेडमध्ये राहत्या घराला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये १६ जणांचे संसार जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन बंबांच्या साहाय्याने पहाटे पाचच्या सुमारास आग आटोक्यात आणली. आग लागल्यानंतर वेळीच मदत मिळाल्याने तीन लहान मुले आणि त्यांची आई वाचली.
स्थानिक नागरिकांनी तातडीने ज्येष्ठांसह लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी हलविले. मुलीच्या लग्नासाठी बस्ता आणि साहित्य जळून खाक झाले. गॅरेजचालकाच्या मशिनरी जळून खाक झाल्या. त्यामुळे स्वयंरोजगार केलेला तरुण पुन्हा बेकार झाल्याने नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. दरम्यान, हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी-कर्मचारी साडेतीन-चारच्या सुमारास आले, त्यांनी पंचनामा केला.
भयंकर! हडपसरमध्ये घरांना भीषण आग; 16 जणांचे संसार जळून खाक #Pune#Firepic.twitter.com/QEnf0TIERt
— Lokmat (@lokmat) July 17, 2022