हैदराबाद - हडपसर एक्स्प्रेससाठी ८९ प्रवाशांनी काढले तिकीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:09 AM2021-07-08T04:09:55+5:302021-07-08T04:09:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : हैदराबाद-हडपसर एक्स्प्रेस गुरुवारपासून सुरू होत आहे. पहिल्या दिवशी जवळपास ८९ प्रवासी (बुधवार रात्रीच्या आरक्षण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : हैदराबाद-हडपसर एक्स्प्रेस गुरुवारपासून सुरू होत आहे. पहिल्या दिवशी जवळपास ८९ प्रवासी (बुधवार रात्रीच्या आरक्षण स्थितीवरून) प्रवास करतील. गाडीची एकूण प्रवासी क्षमता ही ९४८ इतकी आहे. पैकी ८९ प्रवाशांनी आपले आरक्षित तिकीट काढले आहे. प्रवाशांचा जवळपास १० टक्के प्रतिसाद लाभला.
हडपसर स्थानकावर सुविधा नसताना ही गाडी सुरू होत आहे. शिवाय याची वेळ देखील गैरसोयीचे असल्याने याला प्रवाशांचा कितपत प्रतिसाद लाभेल, याबाबत आताच शंका उपस्थित होत आहे. पहिल्या दिवशी हैदराबाद ते हडपसर ८९ प्रवाशांनी आरक्षित तिकीट काढले, तर ९ जुलैला हडपसर स्थानकावरून सुटणाऱ्या एक्स्प्रेसचे ७४ प्रवाशांनी तिकीट काढले आहे. ही बुधवारची स्थिती असल्याने यात शुक्रवारपर्यंत थोड्या फार प्रमाणात बदल देखील होऊ शकतो. यावरून हडपसरहून जाताना प्रवाशांचा केवळ ८ टक्के प्रतिसाद आहे. असाच प्रतिसाद राहिला तर अट्टहासाने सुरू केलेली ही गाडी बंद करण्याची नामुष्की दक्षिण मध्य रेल्वेवर येऊ शकते.