Video: "मी बाजीराव तर माझी मस्तानी कुठाय", खासदार गिरीश बापट यांची मिश्किल टिपणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 03:01 PM2022-01-31T15:01:45+5:302022-01-31T15:03:50+5:30
पुणे - पाबळ या पीएमपी बससेवा उदघाट्नच्या निमित्ताने पुणे महापालिकेसमोरील कार्यक्रमात अॅड. सुरेश पलांडे यांनी खासदार गिरीश बापट यांचे कौतुक केले.
पुणे : पुणे - पाबळ या पीएमपी बससेवा उदघाट्नच्या निमित्ताने पुणे महापालिकेसमोरील कार्यक्रमात अॅड. सुरेश पलांडे यांनी खासदार गिरीश बापट यांचे कौतुक केले. त्यावेळी गेल्या ४० वर्षात ज्यांना कोणी हरवू शकले नाही. असे पुण्याचे बाजीराव म्हणजे गिरीश बापट आहेत असं ते म्हणाले होते. हे ऐकून बापट यांनी त्यांच्या वक्तव्यावर मिश्किल टिपणी केली आहे. 'मी बाजीराव तर माझी मस्तानी कुठाय' असे बापट म्हणाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अनेकांना याबाबत प्रसंगी पडू लागला आहे. त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.
कार्यक्रमात गिरीश बापट यांनी माझी मस्तानी कुठाय असे विचारल्यावर पलांडे यांनी सुद्धा उत्तर दिले आहे. ते म्हणाले, भाऊ आपण खूप मोठे आहात. पुण्यासाठी आपण अद्वितीय नेतृत्व केले आहे. आपण बाजीराव आहात पण मस्तानीबद्दल आम्हाला अजून काही माहिती मिळाली नाही. असे त्यांनी उत्तर दिले आहे.
मी पुण्याचा बाजीराव तर माझी मस्तानी कुठाय; गिरीश बापट यांची मिश्किल टिपणी#Pune@MPGirishBapatpic.twitter.com/m9k0cdvdEk
— Lokmat (@lokmat) January 31, 2022
पीएमपीएमएल व्यवस्थापनाने पुणे ते पाबळ या मार्गावर बससेवा सुरू केली आहे. खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते या मार्गावरील बससेवेचे उद्घाटन करण्यात आले. पुणे, कोरेगाव भीमा, सणसवाडी, शिक्रापूर, मुखई, जातेगाव बुद्रूक, धामारी ते पाबळ या सर्वच गावांमध्ये या बससेवेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी हा विनोदी प्रसंग घडला आहे.
बापट यांचे केले कौतुक
ज्यांच्यामुळे हे बससेवा मिळाली ते आदरणीय भाऊ गिरीश बापट आहेत. चाळीस वर्षात अनेक निवडणुका झाल्या. त्यांना कधी कोणीही हरवू शकलं नाही. असे अद्वितीय असे पुण्याचे बाजीराव कोण असतील तर ते गिरीश बापट आहेत.