मैं तो अभी अठरा बरस का हूँ; पं. हरिप्रसाद चौरसिया यांची मिश्कील टिप्पणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 04:10 AM2018-08-23T04:10:30+5:302018-08-23T05:14:16+5:30

२,७०० किलो धान्य केरळला पाठविणार

I am just eighteen years old; Pt Miscellaneous comment by Hariprasad Chaurasia | मैं तो अभी अठरा बरस का हूँ; पं. हरिप्रसाद चौरसिया यांची मिश्कील टिप्पणी

मैं तो अभी अठरा बरस का हूँ; पं. हरिप्रसाद चौरसिया यांची मिश्कील टिप्पणी

पुणे : वयाची ८० वगैरे संख्या मी पाहत नाही, ‘मैने अभी अपना जीवन शुरू किया है, मैं तो अभी १८ साल का हूँ। मला माझ्या वयाची आठवण करून देऊ नका. जेव्हा मला वाटेल तेव्हा मी वय सांगेन. लोग मुझे ८० बरस का कहते हैं तो मुझे मजा नहीं आता,’ अशी मिश्कील टिप्पणी करीत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी सभागृहात हास्याची कारंजी उडवली.
वंदेमातरम् संघटनाकृत युवा वाद्य पथक, शिवसाम्राज्य पथक, शिववर्धन पथक यांच्या वतीने महाराष्ट्रातील विविध पथकांच्या वाद्याचे एकत्रित अभिनव पूजन पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते झाले. या वेळी वयाची ८० वर्षे पूर्ण केल्याबद्दल पं. हरिप्रसाद चौरसिया यांची धान्यतुला करण्यात आली. जमा झालेले २,७०० किलो धान्य केरळ पूरग्रस्तांसाठी अरभाट फिल्मसकडे सुपूर्त करण्यात आले.
या प्रसंगी महापौर मुक्ता टिळक, तालयोगी पं. सुरेश तळवलकर, प्रसिद्ध तबलावादक तौफिक कुरेशी, पं. विजय घाटे, प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया, नगरसेविका गायत्री खडके आणि वैभव वाघ हे उपस्थित होते.
पुणेकरांनी केलेली धान्यतुला आणि दिलेल्या सन्मानाबद्दल पं. चौरसिया यांनी कृतज्ञता व्यक्त केली. पुण्यात कलाकारांवर एवढे प्रेम करणारे लोक आहेत. त्यामुळे नोटाबंदी वगैरेसारख्या प्रश्नातून पुण्यात कधीच कलियुग येणार नाही. आजचा क्षण हा कायम स्मरणात राहील. एका कलाकाराचा आदरसन्मान कशा प्रकारे करायला हवा, ही गोष्ट नव्या पिढीला कळाली पाहिजे. आज ज्या वाद्याने कलाकाराला मोठे केले, त्या वाद्याचीदेखील पूजा केली पाहिजे. कारण या वाद्यामुळेच कलाकाराची ओळख निर्माण होते, असे सांगून ते पुढे म्हणाले, ‘‘पूर्वीच्या काळात बासरी जत्रांमध्ये वाजवली जायची. हे वाद्य असे आहे, की त्याची किंमतही जास्त नाही. बासरी वाजवायला जरी सोपी वाटत असली, तरी त्यात मेहनत खूप आहे. ती ट्यून करून वाजवणे अवघड आहे. लय आणि सूर व्यवस्थित ऐकण्यासाठी कान तयार पाहिजेत.’’

फ्युजनचा अर्थ कळेना
संगीतातील ‘फ्युजन’ प्रकाराकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहता? असे चौरसिया यांना विचारले असता त्यांनी फ्युजनचा अर्थ अजूनही कळाला नसल्याचे सांगितले. फ्युजनमध्ये भारतीय कलाकार व परदेशी कलाकार एकत्रितपणे वाजवतात; पण परदेशी कलाकारांना भारतीय संगीत वाजवायला जास्त आवडते. मी आजही शिष्यांकडून शिकतो. या जन्मातही विद्यार्थी राहण्याची इच्छा असल्याचे त्यांनी नम्रपणे सांगितले.

 

Web Title: I am just eighteen years old; Pt Miscellaneous comment by Hariprasad Chaurasia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.