‘तू माझा स्वाभिमान’ स्पर्धा उत्साहात

By admin | Published: December 22, 2016 02:37 AM2016-12-22T02:37:51+5:302016-12-22T02:37:51+5:30

आपल्या मुलांना जीवनाचा आनंद देणारे, त्यांना चांगले भविष्य देणारे त्यांचे पालक आणि कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आपली

I am proud of the competition 'You are my self-esteem' | ‘तू माझा स्वाभिमान’ स्पर्धा उत्साहात

‘तू माझा स्वाभिमान’ स्पर्धा उत्साहात

Next

पुणे : आपल्या मुलांना जीवनाचा आनंद देणारे, त्यांना चांगले भविष्य देणारे त्यांचे पालक आणि कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आपली पसंती-नापसंती याकडे दुर्लक्ष करतात. ते मुलांच्या करिअर आणि भविष्याचा मुख्य आधार असतात. यात आईची भूमिका अतिशय संवेदनशील ठरते. कर्तव्य आणि प्रेमाचा संगम आईमध्ये पाहावयास मिळतो. याच विषयावर लोकमत सखी मंच आणि कलर्सतर्फे ‘तू माझा स्वाभिमान’ या कार्यक्रमाचे द्वारका मंगल कार्यालय, चंदननगर येथे आयोजन करण्यात आले होते. यात आई आणि मुलीच्या मैत्रीपूर्ण भावनात्मक नात्यावर आधारित ‘आम्ही दोघी माय-लेकी’ ही स्पर्धा घेण्यात आली.
स्पर्धेच्या चार राऊंडमध्ये आई-मुलींच्या जोड्यांनी व्यासपीठावर प्रभावी सादरीकरण केले. स्पर्धेच्या पहिल्या राऊंडमध्ये आई आणि मुलीच्या जोडीने कविता, शेरो-शायरीच्या अंदाजात एकमेकींची ओळख करून दिली. दुसऱ्या राऊंडमध्ये आई-मुलींनी गायन, नृत्य, अभिनय सादर केले. तिसरा राऊंड ‘सिच्युएशन राऊंड’ होता. यात परीक्षकांनी एकेका जोडीसमोर परिस्थिती निर्माण करून त्याच्याशी संबंधित प्रश्न विचारले. एका आई-मुलींच्या जोडीला विचारण्यात आले, की ‘जर मुलीसाठी खूप श्रीमंत स्थळ आले आणि त्यांनी लग्नानंतर मुलीला नोकरी करण्यास मनाई केली, तर काय करणार? जर कोणी आईचा अपमान केला तर काय कराल?’ या पद्धतीने विचार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या प्रश्नांचा सामना स्पर्धकांनी केला. चौथ्या राऊंडमध्ये परीक्षकांनी आई आणि मुलीला त्यांच्या एकमेकींच्या आवडी-निवडींवर प्रश्न विचारले.
सिमरन जेठवानी, वनिता बजाज यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. या वेळी दिलीप देवकर, मारूती दसगुडे, शिल्पाताई सातव, धनश्री बनसोडे , आशाताई गलांडे आदी उपस्थित होते.
स्पर्धेत १० आई-मुलींच्या जोड्यांची निवड आॅडिशनच्या माध्यमातून करण्यात आली. यांतील पाच जोड्यांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. शेखरकुमार यांनी सूत्रसंचालन केले. नेहमीच कौटुंबिक विषय घेऊन येणाऱ्या कलर्स चॅनलने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. ‘कलर्स’वर १९ डिसेंबरपासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता आई-मुलींच्या मजबूत नात्यावर ‘एक शृंगार... स्वाभिमान’ या मालिकेचे प्रसारण होत आहे.
यात गणिताची शिक्षिका शारदा हिने आपल्या दोन मुलींना आधुनिक विचारांसोबतच स्वाभिमानाने जगणे शिकविले. मुलींना कर्मठ करण्यासाठी आधी नोकरी आणि नंतर लग्न करण्याची भूमिका घेऊन शारदा समाजासमोर अनेक प्रश्न निर्माण करते. नोकरी करण्याचा उद्देश केवळ पैसे मिळविणे नसून, स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग आहे.
घर सांभाळून नोकरी करणारी स्त्री आदर्श आणि नोकरीद्वारे करिअरला अधिक महत्त्व देणारी स्त्री आदर्श का नाही, असा प्रश्न शारदा समाजासमोर ठेवते. तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे काय आहेत, हे या मालिकेत दाखविण्यात आले आहे. ‘आम्ही दोघी माय-लेकी’मध्ये एकमेकींना समजून घेणाऱ्या एकमेकींसोबत मैत्रिणीसारख्या वागणाऱ्या आई-मुलींच्या जोड्यांना पुरस्कृत करण्यात आले. उपस्थित सखींनी ‘एक मिनीट’ या गेम शोचा आनंद लुटला.
(प्रतिनिधी)

Web Title: I am proud of the competition 'You are my self-esteem'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.