रेमडेसिविर इंजेक्शनसाठी अॅडव्हान्स देण्यास मी तयार : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:12 AM2021-04-24T04:12:10+5:302021-04-24T04:12:10+5:30
पुणे : राज्य सरकारला अॅडव्हान्स पैसे देता येत नसतील, तर जो डिस्ट्रिब्युटर अॅडव्हॉन्स पैसे मागेल त्याला समाजातील दानशूर व्यक्तींकडून ...
पुणे : राज्य सरकारला अॅडव्हान्स पैसे देता येत नसतील, तर जो डिस्ट्रिब्युटर अॅडव्हॉन्स पैसे मागेल त्याला समाजातील दानशूर व्यक्तींकडून मी भीक मागून पैसे गोळा करून देतो़ पण महाराष्ट्रात रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण होणार नाही आणि रुग्णांवर योग्य वेळी उपचार होऊन ते बरे होतील याची काळजी घ्या, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले आहे़
दरम्यान, अॅडव्हॉन्सशिवाय रेमडेसिविर मिळत नसल्याचा दावा राज्य सरकार करीत असल्यास, पुणे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना आपण एक कोटी रुपये घेऊन अजित पवारांच्या टेबलवर ठेवा असेही सांगितले असल्याचे पाटील म्हणाले़
एस.एन.डी.टी़ महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण केंद्राचे (कोविड केअर सेंटर) लोकार्पण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते़ या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बिडकर उपस्थित होते़
अजित पवारांनी पत्रक काढून भाजप नेत्यांवर टीका करतानाच, मी आपल्या कार्यकर्त्यांसाठी सतत उपलब्ध असतो़ तसेच भाजपचे नेते देखील मला भेटत असल्याचा दावा केला आहे़ यावर बोलताना पाटील यांनी, अजित पवारांच्या कार्यक्षमतेबद्दल माझा मनात शंका नाही़ पण वाढत असलेल्या कामाचा व्याप पाहता पवार यांनी एकतर पुण्यातून किंवा मुंबईतून कारभार चालवावा, आणि पुण्याला वेगळा पालकमंत्री द्यावा. परंतु, एकूण गरज लक्षात घेता त्यांनी पुण्यातूनच कारभार चालवायला पाहिजे आणि पुण्यात सहज उपलब्ध व्हायला हवे. लोकांना आता या कोरोना आपत्तीतून दिलासा हवा असल्याचेही ते म्हणाले़