Pune MNS: 'मी माझ्या साहेबांसोबतच', वसंत मोरेंनी 'जय श्रीराम' म्हणत केला फोटो शेअर...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 06:24 PM2022-04-11T18:24:09+5:302022-04-11T18:24:48+5:30

राज ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरेंची प्रतिक्रिया

I am with mns raj thackeray Vasant More said Jai Shriram and shared the photo ... | Pune MNS: 'मी माझ्या साहेबांसोबतच', वसंत मोरेंनी 'जय श्रीराम' म्हणत केला फोटो शेअर...

Pune MNS: 'मी माझ्या साहेबांसोबतच', वसंत मोरेंनी 'जय श्रीराम' म्हणत केला फोटो शेअर...

googlenewsNext

पुणे :  राज ठाकरे यांच्या भाषणानंतर पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. मी ज्या भागात १५ वर्षांपासून लोकप्रतिनिधित्व करतोय त्याठिकाणी सर्व मुस्लिम बांधव माझ्या सोबत आहेत. त्यांचे आणि माझे जवळचे संबंध आहेत. त्या भाषणानंतर ती लोक दहशतीखाली गेली आहेत. ज्यांना आम्ही चाचा, मामु, खाला म्हणत मोठं झालोय. ती लोक आमच्याकडे संशयाने बघायला लागली आहेत. त्यामुळे मन व्यथित झाल्याचे ते म्हणाले होते. त्यानंतर वसंत मोरे यांनी शहराध्यक्ष पद सोडले आहे. तर साईनाथ बाबर यांची नवीन शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. 

त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवा सेनेचे वरून सरदेसाई, अशा सर्वांकडून मोरे यांना पक्षात सामील होण्याच्या ऑफर आल्या होत्या. परंतु मोरे यांची शहराध्यक्षपदाची मुदत एक वर्षाची होती. जी मार्चमध्ये संपली. त्यामुळे नव्या शहराध्यक्षांची निवड झाली तरी काही बिघडत नसल्याचे त्यांनी सांगितले होते. राज ठाकरे यांचा शब्द अंतिम असतो. वसंत मोरेंच्या निष्ठा अजूनही राज ठाकरे यांच्यासोबत असल्याच्रेही ते म्हणाले होते. 

आज वसंत मोरे यांना शिवतीर्थ वरून भेटीचे आमंत्रण देण्यात आले होते.  भेटीनंतर वसंत मोरे यांनी मी माझ्या साहेबांसोबतच राहणार असल्याचे फेसबुकवर फोटो शेअर करत सांगितले आहे. आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही. !...जय श्रीराम...! असा मजकूर टाकून फोटो शेअर केला आहे. 

वसंत मोरे पूर्णपणे अडकले होते 

राज ठाकरेंच्या भाषणानंतर राज्यभरात टीका - टिप्पणीचे सत्र सुरु झले होते. पुण्यातून मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे दिसू लागले होते. वसंत मोरे यांनी सुद्धा त्या भाषणानंतर अडचणीत आल्याचे सांगितले होते. त्यांनी माध्यमांसमोर येऊन अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर राजकीय चर्चाना उधाण आले. इतर विरोधी पक्षांकडून मोरे यांना पक्षप्रवेशाची निमंत्रण देण्यात आली. त्यावेळी मोरे याबाबत राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेची वाट बघत होते. पण शिवतीर्थवरून कुठलीही सूचना अथवा निमंत्रण येत नव्हते. त्यामुळे वसंत मोरेंना पूर्णपणे अडकल्यासारखे वाटू लागले. अखेर आज राज ठाकरेंशी भेट झाल्यावर त्यांना एक प्रकारचा दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे.  

Web Title: I am with mns raj thackeray Vasant More said Jai Shriram and shared the photo ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.